लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : राज्य सरकारकडून लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत तसेच ते उत्पादन खरेदीपर्यंत चुकीच्या व अपुऱ्या नियोजनामुळे शेतकऱ्यांची लूट व नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये व त्यांना योग्य हमी भाव मिळावे, या उद्देशाने स्वेच्छानिवृत्तीधारक कृषी सहाय्यक निलेश राठोड याची प्रकृती खालावली असून त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले आहे.चिमूर येथे तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, तूर खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष १ जानेवारी ते ३० मेपर्यंत तूर खरेदी करण्यात यावी, तूर विक्रीनंतर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, तूर खरेदी पाच हजार ६७५ रुपये या हमीभावानीच खरेदी करण्यात यावी इत्यादी मागण्यांकरिता चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच २६ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. राठोड यांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून तुर उत्पादक शेतकरीसुद्धा साखळी उपोषणास बसले. चंद्रपर जिल्ह्यासह वाशीम जिल्हयातील शेतकऱ्यांनीसुद्धा पाठींबा दिला आहे. या आंदोलनाला सहा दिवस होत असूनही कोणत्याही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधीनी याची दखल घेतलेली नाही.
आमरण उपोषणकर्त्यांचे आरोग्य खालावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 9:25 PM