राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, पोंभुर्णा, मूल, कोठारी, गोंडपिपरी या ठिकाणी खा. बाळू धानोरकर यांनी भेटी दिल्या. जिवती तालुका हे चंद्रपूरचे शेवटचे टोक आहे. आरोग्य सेवा अपुरी पडता काम नये याकरिता खा. बाळू धानोरकर यांनी आय. टी. आय येथे कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते कार्यान्वित झाले आले असून कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यासोबतच येथे शववाहिका व जनरेटरची सोय लवकरच उपलब्ध होणार आहे. पोंभुर्णा येथे कोरोनासंबंधी असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली आहे.
२० बेड्सकरिता सेंट्रल पाइपलाइन टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. ते देखील काम अंतिम टप्प्यात आहे. मूल येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. खा. बाळू धानोरकर यांनी याबाबत गंभीर नाराजी दर्शवली. प्रशासनाने दखल घेत आता नियमित स्वच्छता करीत आहे. कोठारी, बामणी, विसापूर येथे २९ तारखेपासून लसीकरण केंद्र बंद होते. हे केंद्र कार्यान्वित झाले. लसीकरणही सुरू आहे. राजुरा येथे पौस्टिक आहार व अंडी देण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेचीही प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे.