मूल : कोंतमवार परिवार व उपजिल्हा रुग्णालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय विकार रोगनिदान शिबिर येथील उपजिल्हा रुग्णालयात पार पडले.शिबिरात नागपूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पोशेट्टीवार, डॉ. मिनल पोशेट्टीवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल गेडाम, डॉ. तिरथ उराडे, डॉ. शेख यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी ४९८ रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. यातील अनेक रुग्ण हे हृदयविकाराने ग्रस्त होते. त्या सर्व रुग्णांची बीपी, शुगर, ईसीजीची नि:शुल्क तपासणी करण्यात आली. नोंदणी केलेल्या रुग्णांना नागपूर येथे इको, टिएमटी, एंजिओग्राफी, एंजिओप्लॉस्टी, बायपास सर्जरी, सीटी स्कॅन, एमआरआय व रक्ताच्या तपासण्यांवर ३० ते ५० टक्के नागपूर येथे सुट देण्यात येणार आहे.शिबिरात मूल व परिसरातील रुग्णांनी येऊन तपासणी केली. सदर शिबिराचे संचालन विजया भास्करवार यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दीपक कोंतमवार, राहुल कोंतमवार, उमेश चेपूरवार, उमेश गरपल्लीवार, निरज नागरेछा यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
उपजिल्हा रुग्णालयात हृदयविकार व रोगनिदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2016 1:10 AM