लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोव्हेंबर महिना सुरू होताच थंडी वाढू लागली आहे. ज्यांना डोक्यावर छत आहे, त्यांना थंडीची झळ बसणार नाही. पण, जे आभाळालाच छत समजून उघड्यावर राहतात, त्यांचे काय, त्यांच्यासाठी ही थंडी जीवघेणी ठरते. अशाप्रकारे थंडीत उघड्यावर राहणाºया निराधारांना ब्लँकेट भेट देऊन भूमिपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्थने माणुसकी जपली.रस्त्यावरील अनाथ, वृद्ध, निवारा नसलेले बहुतांश निराधार लोक फुटपाथ, मंदिर, मशीद, रेल्वेस्थानक, बसस्थानक किंवा रस्त्यावरील दुकानाच्या आडोशाला झोपलेली दिसून येतात. पण, त्यांच्या अंगावर कोणी मायेची चादर टाकायला तयार नसतात. मात्र, माणुसकीचे नाते जपणारेही येथेच आहेत. स्वत:चा खर्च आटोक्यात आणून त्यातून निराधारांना भूमिपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्थेकडून बसस्थानक, रेल्वेस्थानक, मंदिर तसेच शहरातील इतर भागात फिरून शनिवारी रात्री गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.या उपक्रमाला वर्षा ताजणे, आशीष ताजणे, दीपक उपरे, तनुजा बोढाले, लक्ष्मीकांत धानोरकर, विकास हजारे, विठ्ठल रोडे, रूपेश ठेंगणे यांनी सहकार्य केले. ब्लँकेट वाटप कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष वसंता उमरे, संतोष ताजणे, किशन नागरकर, मनोज गोरे, महेश गुंजेकर, किशोर तुराणकर, गणेश पाचभाई, रोशन आस्वले, सुरेश वडस्कर, नीलेश पाऊणकर आदी उपस्थित होते.
निराधारांना दिली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:38 PM
नोव्हेंबर महिना सुरू होताच थंडी वाढू लागली आहे. ज्यांना डोक्यावर छत आहे, त्यांना थंडीची झळ बसणार नाही.
ठळक मुद्देब्लँकेटचे वाटप : भूमिपुत्र युवा एकता बहु. संस्थेचा उपक्रम