शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मनपा राबविणार ‘हीट अ‍ॅक्शन प्लॉन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:38 AM

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चंद्रपूर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका हीट अ‍ॅक्शन प्लान राबविणार आहे.

ठळक मुद्देआयुक्तांची तातडीची बैठक : आपत्ती व्यवस्थापन सज्ज

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चंद्रपूर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका हीट अ‍ॅक्शन प्लान राबविणार आहे. त्यासाठी सोमवारी तातडीची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्यात आले आहे.वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरिरावर तसेच सृष्टीतल्या इतर जीव-जंतूवर दुष्परिणाम होतात. उष्णतेच्या निगडीत आजारपण व मृत्यू टाळता येणे शक्य आहे, तरी दरवर्षी अनेक लोक उष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटी अनुभवल्या आहेत. ‘उष्णतेची लाट’ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्याचे आपत्ती व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून दर उन्हाळ्यात चंद्रपूर मनपाद्वारे उष्माघात कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे प्रस्थापित केलेल्या ‘शित-वार्ड’ मध्ये सन २०१६ मध्ये २७ व सन २०१७ मध्ये एकूण २० उष्माघात रुग्ण भरती झाले असून औषधोपचारानंतर सर्व रुग्ण बरे झाले व एकही उष्माघात मृत्यू झाला नाही. विशेष म्हणजे सन २०१६ मधील उन्हाळ्यात चंद्रपूरचे सर्वाधिक तापमान ४६.८ नोंद केले गेले असून सन २०१७ मध्ये ते ४७.२ होते.चंद्रपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे तयार केलेल्या या उष्माघात कृती आराखड्याची अंमलबजावणी उन्हाळ्यात करण्यात येणार आहे. मनपाने गठीत केलेल्या हिट अ‍ॅक्शन प्लॅन समन्वय समितीची बैठक सोमवारी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे व मनपा अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सदस्यांना मनपा हिट अ‍ॅक्शन प्लानबाबत अवगत करण्यासाठी मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी पॉवर पॉर्इंटद्वारे त्याचे सदरीकरण केले. त्यानंतर समिती सदस्यांनी आपत्ती व्यवस्थापनादरम्यान काय करावे, याबाबत सूचना देण्यात आल्या. मनपा आयुक्त संजय काकडे यांनी सभेत केलेल्या मार्गदर्शनात उष्माघात प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती, बगिचे सुरू राहण्याच्या वेळेत वाढ, स्वयंसेवी संस्था व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची जागोजागी उपलब्धता, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व उष्माघात जनजागृती आदीबाबत सूचना दिल्या.हे कराउन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे, इतर थंड पेय उदा. ताक, आंब्याचे पन्ह, नारळ-पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करणे टाळावे.अशी आहेत लक्षणेअस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुकी, मळमळ ही उष्माघाताची लक्षणे असून असे आढळल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी (डोक्यावरुन गार पाण्याने आंघोळ केल्यास तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करु नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.