लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चिमूर तालुक्यातील शंकरपूरपासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या चिचाळा (शास्त्री) येथील दौलत ज्योतिराम गजभिये यांचे राहते घर सोमवारी मध्यरात्री पावसामुळे कोसळले. घरातील सदस्य त्याखाली दबून गेले. गावकऱ्यांनी मोठ्या शर्थीने त्यांना बाहेर काढले असले तरी सुमारे १५ शेळ््या अद्यापी त्या ढिगाºयाखाली दबून आहेत.गजभिये यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असल्याने या शेळ््यांच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गजभिये पती पत्नीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.चिमूर तालुक्यात सोमवारी मध्यरात्री १ च्या सुमारास संततधार पावसाला सुरूवात झाली. येथील नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे चिमूर ते हिंगणघाट, खडसंगी ते मुरपार व चिमूर ते पिरपरडा असे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे प्रवासी, नोकरदार व विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात संततधार; घरे कोसळली, संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:36 AM
सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला असून काही ठिकाणची घरे कोसळली आहेत.
ठळक मुद्देशेळ््या मरण पावल्याने नुकसान