लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील सर्वच वार्डातील नाल्यांची स्वच्छता केली. कामगार आणि जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांचाही उपसा करण्यात आला. मात्र, आधीच्याच त्रुटी जैसे थे ठेवल्याने मंगळवारी सायंकाळी झालेल्या धुवांधार पावसाने बहुतांश नाल्यांची पोलखोल झाली. वाहनधारकांना मुख्य मार्गावर येण्यासाठी मोठी दमछाक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.चंद्रपूर महानगर पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विविध वार्डांमध्ये नाल्यांची स्वच्छता केली. ज्या वार्डातील नाल्यांना बरेच वर्ष तेथे नव्याने बांधकाम पूर्ण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील गांधी चौकापासून जटपुरा गेटपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गाला जोडणारे बहुतांश पाईपलाईन दुरूस्त करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च झाला. वर्दळीच्या मुख्य मार्गासोबत शहरातल्या सर्वच प्रभागांमध्ये नाल्यांचा उपसा करण्यात आला. बांधकामाच्या कंत्राटावरून महानगर पालिकेच्या सभेत मोठा गदारोळही उठला होता.कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाने या कामांकडे विशेष लक्ष दिल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर नाल्यांमधून पाणी बाहेर निघणार की नाही याची चाचणी करण्यात आली. मुसळधार पाऊस पडल्यानंतरच खरे चित्र पुढे येणार होते.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने झोडपल्याने मुख्य मार्गाला जोडणाऱ्या बहुतांश नाल्या चोकअप झाल्या. पावसाचे पाणी नालीतून पुढे न गेल्याने रस्त्यावर आले. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच केलेल्या स्वच्छतेवर चंद्रपूर शहरातील नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.नाल्यांची करावी तपासणीमनपाने नालीची स्वच्छता करण्यासोबतच अनेक ठिकाणी लहान पुल बांधले. परंतु, यातून पाणी बाहेर निघेल की नाही, याची खात्री केली नाही. त्यामुळे नालीतील पाणी साचून आहे तर कुठे रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र आहे. नव्याने बांधकाम केलेल्या सर्व नाल्यांची तपासणी करण्याची मागणी चंद्रपूर शहरातील नागरिकांनी केली आहे.चुकीच्या नियोजनाचा फटकाआझाद गार्डनजवळ सांडपाण्याचे पाईपलाईन फुटले आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मनपाकडून एक आठवड्यापासून पाईपलाईन दुरूस्तीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या पाण्यामुळे वाहने घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चुकीच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. सांडपाणी वाहत असल्याने प्रशासनाने मंगळवारपासून जटपुरा गेटकडे जाणाऱ्या वाहनांना आझाद गार्डन परिसरातून वळविण्याचा निर्णय घेतला.बहुतांश वार्डात नाल्यातील पाणी रस्त्यावरशहरातील सर्वच वार्डांतील नाल्यांचा उपसा झाला आहे. मात्र ही कामे पूर्ण करताना प्रशासनाकडून अनेक चुका झाल्या. त्यामुळे पावसाचे पाणी नालीतून बाहेर निघण्याचे मार्ग बंद झाले. विठ्ठल मंदिर, बालाजी वार्ड, सिस्टर कॉलनी, पठाणपुरा वार्ड, नगीना बाग, गंजवार्ड, अंचलेश्वर वार्ड, तुकूम, बंगाली कम्प व इंदिरानगर परिसरातील नालीतील पाणी थेट रस्त्यावर आल्याचे दिसून आले.
धुवाधार पावसाने चंद्रपुरातील अनेक नाल्यांची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM
चंद्रपूर महानगर पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विविध वार्डांमध्ये नाल्यांची स्वच्छता केली. ज्या वार्डातील नाल्यांना बरेच वर्ष तेथे नव्याने बांधकाम पूर्ण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील गांधी चौकापासून जटपुरा गेटपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गाला जोडणारे बहुतांश पाईपलाईन दुरूस्त करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च झाला. वर्दळीच्या मुख्य मार्गासोबत शहरातल्या सर्वच प्रभागांमध्ये नाल्यांचा उपसा करण्यात आला.
ठळक मुद्देजागोजागी नाल्या चोकप : पाणी रस्त्यावर, नागरिकांची त्रेधातिरपीट