शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता पुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 5:00 AM

जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्व तयारी सुरु केली असून संभाव्य पुरपरिस्थितीच्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरु केली तयारी ; तालुकास्तरावरही पथकांचे केले गठन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व तयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बैठक तसेच विभागनिहाय सूचना जारी केल्या असून विभाग संभाव्य पुरपरिस्थितीसोबत लढण्यास सज्ज आहे.जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्व तयारी सुरु केली असून संभाव्य पुरपरिस्थितीच्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहे. पूर आल्यास कोणत्या उपाययोजना करावयाच्या यासंदर्भात आराखडाही तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्यातील पोट कलम २ नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. यानुसार त्यांनी सर्व संबंधित अधिकारी तसेच विभाग प्रमुखांना मान्सूनपूर्व तयारीची सर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुकास्तरावर तसेच महापालिका, नगरपरिषदांनाही सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पूरबाधित क्षेत्रजिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या नद्यांसह इरई, झरपट या नद्या आहेत. या नद्यांतील क्षेत्रामध्ये काही गावांना पुराचा फटका बसतो. तर इरई धरणालगत असलेल्या गावांसह चंद्रपूर शहरालाही पुराचा फटका बसतो. यासोबतच राजुरा, नागभीड, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, मूल, सिंदेवाही या तालुक्यातील गावांना पुराचा धोका असतो.

चंद्रपूर शहरात १०१ इमारती धोकादायकपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील इमारतींचे महापालिकेने सर्व्हेक्षण केले असून शहरातील ३ झोनमध्ये १०१ इमारती धोकादायक आहे. त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात झोननिहाय उपायुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील यांच्या आदेशानुसार धोकादायक इमारत मालकांना नोटीस पाठविण्यात आला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी या इमारती सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अग्नीशमन दलात रिक्त पदांचे ग्रहणजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महानगरपालिका अग्णीशमन दल, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर पंचायती सज्ज आहे. असे असले तरी चंद्रपूर अग्नीशमनदलात रिक्त पदाचे ग्रहण आहे. अनेक पदे रिक्त असल्यामुळे येथील कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. पोलीस विभाग, उपविभागीय कार्यालय तसचे तहसील कार्यालयामंध्ये विविध पथकांचे गठण करण्यात आले आले असून बचाव व साहित्य उपलब्ध करून दिले

मान्सून पूर्व तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी केली आहे. तालुका, नगरपरिषद विभागांना सूचना करण्यात आल्या आहे. पोलीस तसेच विविध विभागात पथकांचेही गठन केले आहे.-जितेश सुरवाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर