लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देशाचे संविधान बदलविण्यास देशात सत्तेत आलो आहोत. लवकरच संविधान बदलवू, असे बेताल वक्तव्य करणाºया केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी रिपब्लिकन संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे़ना़ हेगडे यांचे विधान राष्ट्रहिताविरुद्ध व भारतीय समाजात वर्णव्यवस्था मजबूत करणारे आहे़ धर्मनिरपेक्ष हा संविधानाचा प्राण आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. न. प. माजी उपाध्यक्ष भारत थुलकर यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना देण्यात आले. यावेळी अरुण लोखंडे, अनिल भाले, मुन्ना दिगवा, आंबेडकर मून, संजय डुंबेरे, प्रभूदास देवगडे, दिलीप मून, सिद्धार्थ कांबळे, सत्यभामा भाले, वच्छला तेलंग, सुनीता कांबळे, रत्नमाला नरांजे, वनमाला भसारकर, अनुसया पेटकर, बी. एस. खोब्रागडे, संगीत तेलंग, रमेश रामटेके, धर्मेंद्र गायकवाड, बंडू खोब्रागडे, लक्ष्मण धोंगडे, रामचंद्र मून, नागोराव मून, मनोहर मानकर उपस्थित होते़
हेगडे यांना राज्यमंत्री पदावरुन हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:42 AM