लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.देशात हरितक्रांती झाल्यापासून शेतकरी अनेक कंपनीची औषधी घेऊन फवारणी करत आहे. परंतु आतापर्यंत अशी जीव गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली नाही. परंतु याच वर्षी का आली. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. शेतकºयांचा जीव घेणे इतके सोपे झाले आहे का? असा प्रश्न शेतकरी करीत आहे. शेतीच्या अनेक योजना शेतकºयांपर्यंत पोहचल्या नाहीत. योजनांत गैरव्यवहार होत आहे. विषबाधेने जे शेतकरी मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाना १० लाख रुपये त्वरीत मदत देण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा चंद्रपूर शाखेने केली. निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेतली नाही तर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना यावेळी चंद्रकांत वैद्य केंद्रीय निरीक्षक, विनोद थेरे विभागीय अध्यक्ष, प्रविण काकडे जिल्हाध्यक्ष (दक्षिण), चंद्रशेखर झाडे (सचिव दक्षिण), विनोद निमकर, जिल्हा संघटक आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:50 PM
किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.
ठळक मुद्देकिटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी,