लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाच्या लहरीपणामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. धानपिकावर करपा, मावा-तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी यासारख्या विविध कीड रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. त्यामुळे धान पिकाचे तत्काळ सर्व्हे करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेस नेते तथा विधीमंडळ उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे.विविध कीड रोगामुळे हाती येणारे पीक नष्ट होत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देऊळगाव येथील दोन शेतकºयांनी २४ आॅक्टोबरला शेतातील उभे असलेले धान पीक जाळून टाकण्याची दुर्दैवी घटना घडली. असे असताना सुद्धा सरकारने सर्व्हे करण्याचे आदेश अद्यापही महसूल, कृषी विभागास दिलेले नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उभ्या असलेल्या धान पिकावर विविध किडरोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी करावी व अहवाल शासनास सादर करावा आणि कीड रोगामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने मदत द्यावी तसेच पीक विमा काढलेल्या शेतकºयांना विम्याचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी आमदार वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकºयांनी महागडे बियाणे पेरणी केले. मात्र अल्प पावसामुळे ब्रह्मपुरी, सावली आणि सिंदोही तालुक्यातील ४० ते ५० गावांना रोवणी करता न आल्यामुळे शेकडो एकर शेती पडीत आहे. यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अखेरच्या टप्यात असलेले धानपीक वातावरणाच्या बदलामुळे व पाहिजे त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने करपा, मावा, तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळीची मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल असून शासनाने तत्काळ मदत करावी.
धानपिकांचा सर्वे करून शेतकºयांना मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:54 PM
पावसाच्या लहरीपणामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. धानपिकावर करपा, मावा-तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी यासारख्या विविध कीड रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांची शासनाकडे मागणी