शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बहिण व भावाच्या मदतीने पतीला केले ठार

By admin | Published: November 27, 2015 1:15 AM

सीएमपीडीआय कॅम्प नजीकच्या इंदिरानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ४५ वर्षीय ज्ञानेश्वर नारायण वडस्कर यांचा ...

२४ तासांत मारेकरी अटकेत : पत्नीसह सहा जणांना अटक वरोरा : सीएमपीडीआय कॅम्प नजीकच्या इंदिरानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ४५ वर्षीय ज्ञानेश्वर नारायण वडस्कर यांचा वरोरा-चिमूर मार्गालगतच्या वामन डोह नाल्या नजीक बुधवारी सकाळी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता, २४ तासांत मारेकरी जाळ्यात अडकले. पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपल्या बहिण व भावाच्या मदतीने पतीला ठार केल्याचे स्पष्ठ झाले आहे. याप्रकरणी मृताची पत्नी वर्षा ज्ञानेश्वर वडस्कर (३०), छाया राहुल पिंपळशेंडे (२५) रा. कॉलरी वार्ड, किशोर सुरेश टाले, राहुल महादेव पिंपळशेंडे, निखील सुरेश टाले, विजय राजु टाले यांना ताब्यात घेवून कलम ३०२, २०१, ३४ भादंविने गुन्ह्याची नोंद केली आहे. वरोरा शहरा नजीकच्या फुकट नगरामध्ये ज्ञानेश्वर वडस्कर हे पत्नी वर्षा व मुलाबाळांसह राहत होते. ज्ञानेश्वर फार पूर्वी मिस्त्रीचे काम करीत होता तर त्याची पत्नी वर्षा ही लोकांच्या घरी भांडी व कपडी धुन्याचे काम करीत होती. ज्ञानेश्वर हा पत्नी वर्षाच्या चारित्र्यावर संशय घेवून दारुच्या नशेत नेहमी मारझोड करायचा. त्यामुळे पतीपासून वर्षा त्रस्त झाली होती. तिने वरोरा शहरात राहणाऱ्या आपल्या बहिणीस व आपल्या चुलत भावास ज्ञानेश्वरच्या प्रतापाची माहिती सांगितली. पत्नीने, बहिण व चुलत भावाला सोबत घेऊन पतीला संपविण्यासाठी कट रचला. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर घरी असताना पत्नी, तिची बहिणी व भावाने ज्ञानेश्वरला पकडून दुपट्याने गळा आवळला. ज्ञानेश्वर ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडावर उशी दाबण्यात आली. ज्ञानेश्वर मृत पावला याची शहानिशा केल्यानंतर दुचाकीवर त्याचा मृतदेह ठेवून वरोरा-चिमूर मार्गालगतच्या बामडोह नाल्याशेजारी मृतदेह टाकून दिला व सकाळी ज्ञानेश्वर घरुन बेपत्ता झाल्याची तक्रार वरोरा पोलिसात करण्यात आली. एक अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळताच वरोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविली. त्यात मृतदेह ज्ञानेश्वरचा असल्याचे निष्पन्न झाले. मारेकऱ्यांनी कुठलाही पुरावा मृतदेहाजवळ सोडला नसल्याने वरोरा पोलिसांसमोर मोरकरी शोधण्याचे आवाहन उभे राहिले होते.गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा तपास चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अिधकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मसराम, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, पोलीस उपनिरीक्षक मेश्राम, ढेंगळे, डी.बी. पथकाचे उमाकांत गौरकार, सिद्धार्थ पेटकर, मदन येरणे, राकेश तुराणकर, अनिल बैठा, निलेश मुडे, निखील कौरासे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)असे सापडले मारेकरीशवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच वरोरा पोलिसांच्या डी.बी. पथकाने मृताच्या घराची अत्यंत बारकाईने पाहणी केली. प्रत्येक वस्तुची तपासणी करणे सुरू केले. तेव्हा सोपासेटचे दोनच कव्हर धुवून वाळू घालण्यात आले होते. त्यामुळे सोफासेटची पाहणी केली असता, त्यावर रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे घरातच ज्ञानेश्वरचा गळा दाबून मारल्याचा विश्वास डी.बी. पथकास झाला. पथकाने मृताच्या पत्नीस ताब्यात घेतले. तेव्हा तिने सर्व हकीकत कथन केली. श्वान पथक परतलेघटना स्थळावर वरोरा पोलिसांनी श्वान पथक नेले. त्याला मृताचे कपडे, चप्पल श्वास घेण्यास दिले. परंतुु श्वान पथक घटनास्थळावरच फिरल्याने तिथून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.शवविच्छेदन अहवालातहत्येचा संशय वरोरा पोलिसांनी तातडीने शवविच्छेदन अहवाल मागितला. त्यात ज्ञानेश्वरचा मृत्यू गळा दाबल्याने झाला व त्याला फरफटत नेल्याचे नमूद करण्यात आले.