चंद्रपूर : कोरोनाकाळात आप्तेष्ट व नातेवाईक दुरावले असताना येथील फ्रेंडस् चॅरिटी ग्रुपच्या सरिता मालू या बाधितांच्या मदतीला धावून जात आहेत. आजपर्यंत त्यांनी ३० ऑक्सिजन सिलिंडर, सात रुग्णांना प्लाझ्मा व सहा रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाने कोरोनाबाधितांना आधार मिळाला आहे.
कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. प्रशासन, आरोग्ययंत्रणा प्रयत्नरत आहे; परंतु बहुतेक ठिकाणी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. अशा गरजूंना मदत देण्याच्या उद्देशाने फेंडस् चॅरिटी ग्रुप धावून जात आहे. गरजूंना बेड मिळवून देणे, प्लाझ्मा व ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करणे, आदी उपक्रम या ग्रुपतर्फे राबविण्यात येत आहेत. या ग्रुपचे काम सतत सुरू राहील, अशी माहिती ग्रुपच्या अध्याक्ष सरिता मालू यांनी दिली.