वरोरा : आमदार प्रतिभा धानोरकर मतदार संघातील प्रत्येक महिलांच्या संकटात नेहमी धावून जातात. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी त्या स्वतः त्याच्या घरी गेल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्ष त्या कुटुंबातील महिलासोबत संवाद साधला. त्यावेळी संबंधित कुटुंबाला योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याकरिता तहसीलदार यांना सूचना केल्या. त्यानुसार वरोरा तालुक्यातील १४ कुटुंबातील महिलांना आमदार प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार बेडसे, बाजार समिती सभापती राजू चिकटे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष मिलिंद भोयर, संजय गांधी निराधार समिती सदस्य विशाल बदखल, संजय गांधी निराधार समिती सदस्य यशोदा खामणकर, संजय गांधी निराधार समिती सदस्य गायकवाड, संजय गांधी निराधार समिती सदस्य दिवाकर निखाडे, संजय गांधी निराधार समिती सदस्य अविनाश ढेंगळे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य पात्र यादीत सरस्वती सोयाम, रुपाली ठावरी, सोनू देवगडे, मनिषा पिपळकर, प्रेमिला पंधरे, माधुरी बीरिया, वर्षा डाफ, सरिता ठावरी, रेखा देवाळकर, माधुरी बागेसर, नंदा बुरडकर, रत्नमाला नगराळे, देवकी कोटांगले, उषा वानखेडे, छाया कोल्हेकर, मंगला कहूरके, कल्पना लेडांगे यांच्या समावेश होता.
100821\1614-img-20210810-wa0015.jpg
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना आमदार प्रतिभा धानोरकरांनी दिला मदतीचा हात