शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

‘तिच्या’ लग्नासाठी एकवटले गाव

By admin | Published: January 13, 2016 1:02 AM

मुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.

\लोकवर्गणीतून पार पडला विवाह : विसापूरच्या पंचक्रोशीत आगळी-वेगळी घटनाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरमुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. अठराविश्वे दारिद्र्यातील कुटुंबाला अधिकच अडचणीला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी चिंता सतावत असते. मात्र चिंतामग्न असलेल्या एका गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी सारे गाव एकवटले. लोकवर्गणीतून ‘तिचा’ विवाह सोमवारी थाटात पार पडला. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विसापूरच्या पंचक्रोशीत आगळ्या-वेगळ्या विवाहाचा प्रसंग प्रेरणा देणारा ठरला आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथील मधुकर शिवरकर यांची मुलगी अनिता हिच्या लग्नाची ही गोष्ट आहे. चित्रपटाच्या कथानकात साजेसा प्रसंग घडला आहे. मधुकरच्या घरी पत्नी, दोन मुले व दोन मुली असे कुटुंब आहे. घरात दारिद्र्याने ३५ वर्षापूर्वीच ठाण मांडले आहे. अशातच अनिताच्या विवाहाचा प्रस्ताव आला. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील काशिनाथ घुबडे यांचे स्थळ आले. एकमेकांची पसंती झाली. लग्नाचा बेत आखण्यात आला. मात्र परिस्थिती आड येत होती. आईवडिलांना मुलीचे लग्न मोडणार तर नाही ना, ही चिंता सतावत होती. अशातच मुलीचे वडील मधुकर शिवरकर यांनी श्री पंढरीनाथ देवस्थानच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला. येथील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी आस्थेने विचारपूस केली. मुलीकडील परिस्थिती हलाखीची होती. मात्र काशिनाथ घुबडे याचे आईवडील हयात नसल्याची बाब समोर आली. नियोजित वधू-वराचे लग्न झालेच पाहिजे, असा दृढनिश्चय करण्यात आला. या लग्न समारंभाला ऐन विवाहाच्या तीन तास अगोदर लोकवर्गणीचा मार्ग अंगिकारण्यात आला. पाहतापाहता लोकवर्गणी जमा झाली. गावकऱ्यांनी आपल्याच मुलीचे लग्न समजून गावातील सरपंच रिता जिलटे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी लग्नात हिरहिरीने भाग घेतला. यात गावकऱ्यांचा पुढाकारही लाभला. सर्वांचा हातभार लागत असल्याचे पाहून मुलीकडचे पाहुणेही सद्गतीत झाले. वधूच्या आईवडिलांचे डोळे पाणावले. लोकवर्गणीतून पार पडलेल्या विवाह सोहळ्याला समाधानाची सोनेरी किरण लाभली. एखाद्या चांगल्या व श्रीमंत कुटुंबातील लग्नाला लाजविणारा अनिताचा विवाह झाला. तिला निरोप देताना विवाहाला उपस्थितीत असलेले सारेजण हजर होते. एका गरीब मुलीच्या सुखी संसारासाठी आपला हातभार लागला. याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होते.विशेष म्हणजे एकेकाळी मधुकर शिवरकर यांची विसापुरात एकमेव पान टपरी होती. २५ वर्षापूर्वी त्याच्या टपरीवरच वर्तमानपत्र वाचले जात होते. विड्याचे पान बनविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याच्या पान टपरीवर पान खाणाऱ्यांची गर्दी व्हायची. त्याच व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र उधारीमुळे त्याच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले. परिस्थितीचे दृष्टचक्र ओढवले. सढळ हाताने मदत करणाऱ्यांवर याचना करण्याची वेळ आली. तरीही माणुसकी जिवंत असल्याचा पुरावाच विसापूरकरांनी दिला आहे. पंचक्रोशीत हा प्रसंग दिर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आहे.