लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे. चिमूर - वरोरा हा मार्ग निर्माण काळापासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावर विविध समस्या उद्भवत आहेत. बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वाहनचालकासह आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.वरोरा-चिमूर मार्गाचे कंत्राट एस.आर.के.कंपनीकडे असून मागील तीन महिन्यांच्या काळापासून चिमूर परिसरातील मार्गाचे काम ठप्प आहे. सोबतच या मार्गावर पाणी मारण्याचे काम नियमित होत नसल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. ही धूळ लगतच्या शेतातील उभ्या पिकांवर बसत असल्याने पिकांचा रंग हळूहळू काळवंडू लागला आहे. विविध संकटातून धडपड करीत वाचवलेले पीक नव्या संकटात अडकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी नव्या चिंतेत अडकला आहे. याकडे कंत्राट कंपनीचे प्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही ते पर्यायी मार्गावर पाणी मारण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहेत.यामुळे कंत्राटी कंपनीने शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. या मार्गावर उदभवणाºया विविध समस्यांकडे आता तरी बांधकाम विभाग लक्ष देणार काय, असा प्रश्न शेतकरी,नागरिक करीत आहेत.निर्माणाधीन रस्त्याच्या कामावर नियमित पाणी मारत नसल्याने रस्त्यालगतचे पीक धुळीने काळवंडले आहेत. याचा परिणाम झाडाच्या वाढीवर होवून उत्पादन कमी होणार आहे. तेव्हा रस्त्यालगतच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना संबधित कंपानीने भरपाई द्यावी.-प्रशांत कोल्हेशेतकरी वहानगाव (बोथली) तथा तालुका अध्यक्ष मनसे
महामार्गाची धूळ उभ्या पिकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 10:46 PM
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळीमुळे कापसाचे पीक काळवंडले आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
ठळक मुद्देरस्त्या लगतच्या शेतकऱ्यावर नवे संकट : चौपदरीकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका