चंद्रपूर : कठोर परिश्रम घेऊन शासकीय खुर्चीवर बसताच अधिकारी व कर्मचारी पैशाच्या मागे लागत असल्याचे एसीबीच्या कारवाईवरून दिसून येते. मागील तीन वर्षांत एलसीबीने २३ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे लाचखोरीत महसूल व पोलीस विभाग अव्वल असल्याचे चित्र आहे. तीन वर्षात पाच पोलीस तर चार महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
शासकीय कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांकडून कुठल्याची प्रकारची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र अनेक अधिकारी व कर्मचारी आर्थिक हव्यासापोटी पैशाची मागणी करतात. अशा कर्मचाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असतो. या विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार सन २०१९ मध्ये १०, २०२० मध्ये ११, २०२१ मध्ये दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी फुगत चालली आहे.
बॉक्स
४० वर्षांवरील अधिकाऱ्यांना पैशाची हव्यास
सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी शासकीय सेवेत येण्याचे स्वप्न असल्याने अनेकजण शासकीय सेवेत येत असल्याचे सांगतात. मात्र सेवेत आल्यानंतर आपले कर्तव्य विसरून पैशाच्या हव्यासापोटी छोट्या-मोठ्या कामाला पैशाची मागणी करीत असतात. यामध्ये नुकतेच नोकरीवर लागण्यापासून निवृत्तीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाही लाच घेताना अडकले आहेत. साधारणत: ४० वर्षांवरील अधिकारी व कर्मचारी जास्त प्रमाणात लाच घेताना अटक झाले आहेत.
२) सन २०१९मध्ये खासगी इसम, सिंचन, वित्त विभाग प्रत्येकी एक, महसूल व पोलीस प्रत्येकी दोन, जिल्हा परिषद तीन, सन २०२० मध्ये तीन लोकसेवक, महसूल, पोलीस, पंचायत येथील प्रत्येकी दोन, विद्युत विभाग एक, सन २०२१ मध्ये पोलीस व पंचायत विभागाचा एक कर्मचारी जाळ्यात अडकला आहे.
कोट
बहुतेकजण तक्रारी करायला येत नाही. त्यामुळे अशा लाचखोराची हिम्मत वाढते. कुणीही बेकदेशीररीत्या पैशाची मागणी करीत असेल तर त्याची तक्रार करावी. कार्यालयात येणे शक्य नसल्यास तशी माहिती द्यावी, आम्ही स्वत: तपास करून कारवाई करू. तक्रारीसाठी १०६४ हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.
- अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत विभाग, चंद्रपूर