लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : हायवा ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास करंजी-गोंडपिपरी मार्गावर घडली. पुजा कोरडे (२०) रा. धानापूर असे मृतक युवतीचे नाव आहे.वडील दिलीप कोरडे यांना गोंडपिपरी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. दिलीप कोरडे हे शेतातील कामे आटपून बैलगाडीने घरी येत होते. या बैलबंडीवर मुलगी पूजा कोरडे ही बसली होती. दरम्यान, हायवा ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने पुजाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले.अपघातानंतर चालकाने पळ काढला. मात्र मागून येणाऱ्या कार चालकाने गाडीचा पाठलाग करून थांबविले. हा हायवा ट्रक गोंडवाना ट्रॉन्सपोर्ट कंपनीची असल्याची माहिती पुढे आली. गोंडपिपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत. गोंडपिपरी तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. बल्लारपूर तालुक्यातील बामणी ते गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव (वाघाडे) दरम्यान नेहमीच अपघात होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हायवाची बैलगाडीला धडक, युवती ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:16 PM
हायवा ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास करंजी-गोंडपिपरी मार्गावर घडली. पुजा कोरडे (२०) रा. धानापूर असे मृतक युवतीचे नाव आहे.
ठळक मुद्देकरंजीतील घटना : वडील गंभीर जखमी