लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यावाचून नाही. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निधींची तरतुदही करण्यात आली. परंतु, कागदापलीकडे काहीही दिसत नाही. रस्त्याची थातूरमातूर डागडूजी करण्यात आली. या मार्गावरुन प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाºया प्रमुख राज्य महामार्ग क्र. १० नांदेड-मुखेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-स्टेट बॉर्डर-कोरपना-राजूरा-जुनोना-चिचपल्ली-गडचिरोली ते राज्य सीमेला जानेवारी महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी मध्ये परावर्तीत करण्यात आले. यापूर्वीपासून या महामार्गावर खड्ड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आजघडीला आदिलाबाद- कोरपना- राजूरा-बामणी- गोंडपिपरी- आष्टी राष्ट्रीय महामार्गादरम्यान एकट्या कोरपना तालुक्यातील महामार्गाच्या लांबीत राजुरा तालुका सीमा ते राज्यसीमेच्या पट्ट्यात अनेक मोठ्या स्वरूपातील तर शंभरावर अधिक छोटे-मध्यम खड्डे निर्माण झाले आहे. रस्त्याच्या बाजूच्या कडाही पुरत्या दबल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे अतिशय जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे सद्या या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणणे म्हणजेच धाडसाचे होईल.महाकुर्ला- धानोरा- भोयगाव-गडचांदूर- देवाडा, राळेगाव- वणी-वनोजा- अंतरगाव- गडचांदूर, कोरपना- वेळाबाई- मुकुटबन- पारवा (वणी मार्ग), गडचांदूर- सोनापूर-जिवती राज्य महामार्ग खड्ड्यांचे गचक्याने गेल्या दोन दशकांपासून सहन करत आहे. भोयगाव ते कवठाळा फाट्याच्या दरम्यान मार्गावर पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. वनसडी- नारंडा-कवठाळा फाटा-पौनी प्रमुख जिल्हा महामार्गाची दशा याहून वेगळी नाही. कोरपना-धनकदेवी-जिवती या मार्गाचे कामही अत्यंत कासवगतीने सुरू आहे. यातील बहुतांश झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आदिवासी बहुल व अतिदुर्गम समजल्या जाणाºया या भागाचे चांगल्या रस्त्याचे स्वप्न अजूनही अधांतरीच आहे. कोरपना-कन्हाळगाव- सावलहिरा- येल्लापूर हा मार्गही अनेक दशकांपासून रखडलेलाच आहे. आजही येथील नागरिकांना पायीच जाणे हाच पर्याय आहे. याचबरोबर कोरपना- गांधीनगर-कोडशी (बु), जांभूळधरा- रूपापेठ, कोरपना- हातलोणी- घाटराई, आवारापूर- कढोली- नारंडा, नादा-बाखर्डी, रामपूर- खिर्डी- वडगाव-इंजापूर, कोठोडा- रायपूर- परसोडा आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.ग्रामीण रस्तेही उपेक्षिततालुक्यातील कोरपना-कन्हाळगाव-कुसळ, कोडशी(बु)-कोडशी(खु) जेवरा-गांधीनगर, पिपरी-झोटींग-वनोजा, अंतरगाव-सांगोडा फाटा, सावलहिरा-टांगाळा, कन्हाळगाव-चनई-मांडवा, शेरज (खु)- पिपरी, लोणी, कातलाबोडी- सोनूर्ली-चिंचोली रस्त्याचेही भोग अद्यापही संपले नाही. त्यामुळे या रस्त्यांचेही भाग्य कधी उजळणार, हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.खड्ड्यांमुळे चार महिन्यांपासून बसेस बंदभोयगाव मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांंमुळे कोरपना, पेल्लोरा, भोयगाव, गडचांदूर, कवठाळा आदी बसेस बंद झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दोन दशकांपासून या रस्त्याची अवस्था कमी अधिक अशीच आहे. मात्र आश्वासनांच्या पलीकडे रस्त्याचे एक किलोमीटरही दुरुस्तीचे काम झाले नाही.
कोरपना तालुक्यातील महामार्ग बनले ‘मृत्युमार्ग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:42 PM
कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत.
ठळक मुद्देरस्त्यावर जीवघेणे खड्डे : निधीच्या तरतुदींचा केवळ देखावा