अजय चिलबुले, सुभाष भांडारकर, तनवीर कुरेशी आणि मनोज कोहाट अशी या व्यक्तींची नावे असून या चारही व्यक्ती ४० ते ४५ या वयोगटातील आहेत. अजय चिलबुले नागभीड येथील टी-पाॅईंटवरील रेस्टाॅरंटचे संचालक होते. अतिशय मेहनत करून त्यांनी आपले प्रतिष्ठान नावारूपास आणले होते. सुभाष भांडारकर सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते. लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणे हा भांडारकर यांचा स्वभाव होता.
तनवीर कुरेशी यांचाही सामाजिक क्षेत्रात वावर होता. येथील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून कुरेशी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहायचे. त्यांच्या बुकस्टाॅल आणि झेराॅक्स सेंटरचे नागभीडमध्ये चांगलेच नाव आहे. मनोज कोहाट राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी नागभीड ग्रा.पं.चे सदस्यत्व भूषवले होते. येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे ते संचालक होते. कोहाट यांचाही सामाजिक कार्याशी निकटचा संबंध होता.