लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संवर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मोठा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ला स्मारकांचे संवर्धन होणे काळाजी गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी तसेच श्रमदानात सहभागी सदस्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सोमवारी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांनी चंद्रपूर किल्ल्यावर भेट दिली. यावेळी ते बोलत होते. इको-प्रोतर्फे सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास ५९५ दिवस पूर्ण झाले आहे. किल्ला स्वच्छतासोबतच इको-प्रोचे जिल्ह्यातील इतर स्मारकांबाबतसुध्दा कार्य सुरू झालेले आहे. या अभियानासोबतच जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाव्दारे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जात आहे. या अभियानाची पाहणी करण्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भेट दिली असून अभियानातील श्रमदान करणारे कार्यकत्यांचे मनोबल वाढविण्यास त्यांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच किल्ला अभियान जाणून घेत अनेक नागरिकसुध्दा यामाध्यमाने ‘हेरीटेज वॉक’मध्ये सहभागी होत आहे. दरम्यान अभियानस्थळी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी किल्ला स्वच्छता अभियानालाा भेट दिली तसेच इको-प्रो संस्थेच्या मुख्य कार्यालयास भेट देत संस्थेच्या वेग-वेगळया कार्याविषयी माहिती जाणून घेतली.या घाण आणि अस्वच्छता असलेल्या ऐतिहासिक किल्लाची स्वच्छता करण्याकरिता इको-प्रोची युवक स्वंयस्फूर्तपणे समोर येतात. निरंतर हे अभियान चालवितात. हे दुर्मीळ उदाहरण आहे. आपला देश महान आहे. या देशाची गौरवशाली पंरपरा आहे. त्याचे जतन करणे गरजेचे आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे या कार्यात युवकांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी किल्ला स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. यावेळी नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, नितीन बुरडकर, बिमल शहा, संजय सब्बनवार, मनीष गांवडे आदी उपस्थित होते.
ऐतिहासिक किल्ला स्मारक संवर्धन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:14 PM
शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संवर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मोठा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ला स्मारकांचे संवर्धन होणे काळाजी गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देप्रकाश आमटे : चंद्रपुरातील किल्ला स्वच्छता अभियानाला भेट