लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी विनाअनुदानित कृती समितीतर्फे तहसील कार्यालय परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.गेल्या १७ ते १८ वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे महिनाभरापासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. त्यातच मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनकर्त्या शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज केला. यात काही शिक्षक जखमी झाले. याचा निषेध म्हणून जिवती तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच माद्यमिक तसेच अंशत: अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे या मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कायम विना अनुदानित संघटनेचे अध्यक्ष जी. आर. आडे, उपाध्यक्ष संघरक्षित तावाडे, सचिव आर.बी.फड, सहसचिव एस. के. मुंडे, संघटक पी. पी. पवार, कार्यवाहक एल. डी. मंगाम, सलागार एस. एल. गेडाम, सतीश राठोड, बी. बी. वेट्टी, राजू जाधव, पट्टेवाले, विठ्ठल कांबळे, गुणवंत मस्कले, व्ही.व्ही. कोटंबे, नंदेश्वर खोब्रागडे, संतोष इंद्राळे, बालाजी चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.प्राथमिक शिक्षकांचे पगार एक तारखेला कराचंद्रपूर : जिवती पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्याचे निवेदन महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषद प्राथमिक, तालुका शाखा जिवतीच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना दिले. निवेदनात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्यात यावे, डीसीपीएस धारकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने तात्काळ देण्यात यावा, समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश अनुदानाचा दुसरा टप्पा रक्कम शाळेच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी, गोपनीय अहवालाची एक प्रत शिक्षकांना देण्यात यावी, पगारपत्रक पिडीएफ फाईल केंद्रस्तरीय समूहात टाकावी, आॅगस्ट महिन्याचा पगार गणेशोत्सवापूर्वी करावा, सातवा वेतन आयोग फरक तात्काळ देण्यात यावा, वरिष्ठ वेतनश्रेणी, शैक्षणिक परवानगी प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात यावे, मुख्याध्यापक प्रभार सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्यात यावा, संघटनेची सहविचार सभा आयोजित करण्यात यावी, सातवा वेतन आयोग जोडपत्र सर्व शिक्षकांना देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदनातील समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदन देताना महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा जिवतीचे अध्यक्ष विकास तुरारे, कोषाध्यक्ष निलेश भुडे, संघटनमंत्री पंडित राठोड, सहसंघटनमंत्री प्रफुल चिवाने, उपाध्यक्ष रवींद्र धारणे, सहकार्यवाह बाळकृष्ण गावंडे, कार्यालयीन चिटणीस एकनाथ घोडमारे, प्रसिद्धी प्रमुख अशोक मगरे, कैलास उराडे आदींची उपस्थित होती.
जिवतीत विनाअनुदानित शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 1:02 AM
गेल्या १७ ते १८ वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे महिनाभरापासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे.
ठळक मुद्देमुंबई येथील घटनेचा निषेध : विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन