शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

काँँग्रेसकडून शेतकरी विरोधी कायद्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 5:00 AM

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी खासदार बाळू धानोरकर व अन्य पदाधिाकरी उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, देशात कोरोनाने हाहाकार माजविला असताना उपाययोजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले.

ठळक मुद्देजिल्हाभरात निदर्शने, केंद्र सरकारचा अन्यायकारक धोरणांचा निषेधराहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारचे वेधले लक्षग्रामीण भागातही आंदोलनात बेरोजगार युवकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या सात वर्षांत देशात बेरोजगारी वाढली. पेट्रोल, डिझेल व सिलिंडरच्या किमती वाढवून जनतेचे जगणे मुश्कील केले. शिवाय शेतकरी विरोधी काळे कायदे पारित केल्याचा आरोप करून चंद्रपूर शहर जिल्हा व ग्रामीण जिल्हा काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवशी शनिवारी जिल्हाभरात शेतकरी विरोधी कायद्याची प्रतिकात्मक होळी करून सरकारविरूद्ध निदर्शने केली.चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी खासदार बाळू धानोरकर व अन्य पदाधिाकरी उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, देशात कोरोनाने हाहाकार माजविला असताना उपाययोजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले. महागाई, इंधन दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सरकारच्या भक्तांनाही त्रास सहन करावा लागत आहे. परंतु भक्त काहीही बोलू शकत नाही. यापूर्वी महागाई वाढली म्हणून रस्त्यावर उतरणारे भाजपचे नेते कुठेच दिसत नाही, अशीही टीकाही केली.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, प्रकाश देवतळे, प्रवीण पडवेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रविण पडवेकर, उमाकांत धांडे, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनु दहेगावकर, सोहेल शेख, अमजद अली, शालिनी भगत, हरीश कोत्तावर रूचीत दवे, राजेश अडूर, इर्शाद शेख, नरेंद्र बोबडे, स्वाती त्रिवेदी, सुनंदा धोबे, वानी डारला, संध्या पिंपळकर, शीतल कातकर, लता बारापात्रे, प्रशांत भारती, सुलेमान अली, कृणाल रामटेके, मोहन डोंगरे, चंद्र्रमा यादव, नौशाद शेख, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, प्रकाश देशभ्रतार, रूषभ दुपारे, धीरज उरकुडे आदी सहभागी झाले होते.महागाईविरोधात काँग्रेसचे चिमुरात आंदोलन चिमूर : काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी चिमूर तालुका काँग्रेस कार्यालय येथे संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या वाढत्या किमतीविरोधात हजारे पेट्रोल पंप, प्रियंका गॅस एजन्सी व चिमूर कांपा भिसी मार्गावरील चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी  काँग्रेस विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय घुटके, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सविता चौधरी, उपाध्यक्ष विजय डाबरे, मनीष नंदेश्वर, रोशन ठोक, प्रशांत डवले, संदीप कावरे, अविनाश अगडे, धनराज मालके, राजू चौधरी, पप्पू शेख, प्रवीण जीवतोडे, शुभम पारखी, दीक्षा भगत उपस्थित होते.

बल्लारपुरात निषेध आंदोलनबल्लारपूर: माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्वात बल्लारपूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काॅंग्रेस विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम, सिकंदर खान, शंकर महाकाली, संदीप नाक्षिणे, शैलेश लांजेवार, चंचल मून, काशी मेगनवार, तपन उगले, अक्षय वाढरे, चिंटू मारपाक, रोशन ढेगळे, सोहेल खान, मोहम्मद भाई, विकास श्रीवास, एजाज भाई, बाबू खान, दिनेश कैथेल, दानिश शेख़, अरबाज भाई, राजकरण केशकर, मोहमद अहमद, राजेश यादव, बबलू केशकर आदी उपस्थित होते.

मूलमध्ये निषेध आंदोलनमूल : तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली मूल येथे संजय गॅस एजन्सीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ममता रावत, नगरसेविका लीना फुलझेले, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रूपाली संतोषवार,  कृष्णा  सुरमवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, भेजगावचे सरपंच व बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, आदर्श खरेदी- विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेस