लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गुरूवारी ठिकठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.राजुरा येथे शेतकरी संघटनेचे नेते तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे समन्वयक माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड. अरुण धोटे, अॅड. श्रीनिवास मुसळे, अॅड. नांदे, अॅड. आर.टी. सूर, अॅड. येरणे, अॅड. पिंपळकर, अॅड. चौधरी, अॅड. पुणेकर आदी उपस्थित होते.कोरपना येथील बसस्थानक चौकात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दिवे, उपाध्यक्ष अरुण नवले, बंडू राजुरकर, अविनाश मुसळे, अनिता गोडे, विनायक हुलके, वासुदेव गोवारदिपे, अविनाश कोटे, कवडू वासेकर, हरिदास वरपटकर, सुभाष तुराणकर, गजानन चौधरी, रामचंद्र दरेकार, सुरेश मोहीतकर, सुरेश राजुरकर, भास्कर मते, नरहरी कुडमेथे, साईनाथ पधरे, प्रमोद उराडे आदी कार्यकर्त्यानी नागपूर कराराची होळी करून नारेबाजी केली.चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नागपूर करार आणि केळकर समितीचा अहवाल जाळण्यात आला. नागपूर करार बळजबरीने विदर्भावर थोपण्यात आला होता. तसेच केळकर समितीने विदर्भाचा बॅकलॉग चौदा वर्षात पूर्ण करण्यात येईल अस ेअहवालात म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही करार व अहवालाच्या प्रती जाळून विदर्भ स्वतंत्र झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी हिराचंद बोरकुटे, प्रा.चिकटे, किशोर पोतनवार, अय्युबभाई कच्छी, सोमेश्वर येलचलवार, शाहिदा शेख, अनवर आलम मिर्जा, अनिल दिकोंडवार, मितीन भागवत, प्रवीण मोरे, सुभाष थोरात, सुरज गावंडे, दिवाकर माणुसमारे, चंद्रशेखरी चांदेकर, वंसत चांदेकर, संदीप देव, शंकर पिंपळकर, सुधाकर मोकदम आदी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रम्हपुरी येथेही नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी गोविंद भेंडारकर, हरीचंद्र चोले, सुधीर सेलोकर, अशोक रामटेके, डॉ. प्रेमलाल मेश्राम व शेकडो विदर्भवादी उपस्थित होते.जनतेचा संयम पाहू नका -वामनराव चटपकेंद्र व राज्य सरकारने वेगळ्या विदर्भाची घोषणा त्वरित करावी आणि जनतेचा संयम पाहू नये, असे मत अॅड. वामनराव चटप यांनी यावेळी व्यक्त केले. नागपूर कराराप्रमाणे नोकºयांमध्ये २३ जागा विदर्भातील सुशिक्षित युवकांच्या भरण्यात आलेला नाही व विकासातही याप्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली नाही. गडचिरोली-चंद्रपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी देण्यात येत नसल्याचेही अॅड. चटप यावेळी म्हणाले.
जिल्हाभरात नागपूर कराराची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:16 AM
वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गुरूवारी ठिकठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.
ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीचा एल्गार : शेकडो विदर्भवाद्यांचा सहभाग