हरदोना: स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वळल्याने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. शाळेतील तुकडी बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शाळा निर्णय कमेटीने शिक्षकांना विद्यार्थी प्रवेशासाठी बाहेरुन आणण्याची सक्ती केल्यामुळे गुरुजींना रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागत आहे. आपल्याच शाळेतील शिक्षण कसे दर्जेदार आहे, हे पटवून देताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या आई- वडिलांना शर्ट आणि साडी व विद्यार्थ्यांना प्रवासाचा वेगळा खर्च, अशी प्रलोभने दिली जात आहे. इंग्रजी शाळांचे वाढते फॅड लक्षात घेता पालक व विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढल्याने मराठी शाळेत प्रवेश घ्यायला विद्यार्थी तयार नाही. त्यामुळे मराठी शाळांच्या तुकड्या कमी होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने प्रसंगी शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर टांगीत तलवार असल्याने तसेच खासगी शाळेच्या संस्थापकानेही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोधात पाठविल्याची माहिती आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लगीनघाईचा मोसम तेजीत आहे. वेळप्रसंगी शिक्षक लग्न कार्याला बगत देत नोकरी टिकविण्यासाठी दिलेल्या आदेशाचे पालन करीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचत आहे. आपली शाळा किती दर्जेदार आहे, हे पटवून देताना बापाला कमीज आणि मायला साडी व पाल्याच्या प्रवेशाचा वेगळा खर्च अशी प्रलोभने देऊन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात येत आहे. नोकरी टिकविण्यासाठी शिक्षकांना रखरखते उन्ह अंगावर घेत पायपीट करावी लागत आहे.(वार्ताहर)
शिक्षणाची वारी विद्यार्थ्यांच्या घरी
By admin | Published: May 23, 2014 11:46 PM