लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, तसेच बफर क्षेत्रातील कुटुंबांना शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने चांदा बांदा योजनेतंर्गत बफर क्षेत्रातील नागरिकांना सुसज्ज असे ‘होम स्टे’ बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी १५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना योजनेतंर्गत तीन लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे. ‘होम स्टे’ मध्ये विविध सुविधा उपलब्ध असल्याने व पर्यटकांना तेथे राहता येणार असल्याने पर्यटनाचा आनंद दुपटीने वाढणार आहे.हमखास व्याघ्र दर्शन म्हणून तळोधा अंधारी व्याघ्र प्रकल्प जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबा येथे पर्यटनासाठी येतात. पर्यटकांना ताडोबा येथे निवासी राहून पर्यटकांना आनंद घेता यावा व त्यातून परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने चांदा ते बांदा योजनेतंर्गत ताडोबा परिसरातील बफर क्षेत्रात रिसोर्टसारखेच ‘होम स्टे’ बांधून देण्यात येणार आहे. या होम स्टेमध्ये पर्यटकांना मुक्कामी राहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मुक्कामी राहून पर्यटनाचा आनंद घेणे सोईचे होणार आहे. त्यानुसार बफर क्षेत्रातील १५ नागरिकांची निवड करण्यात आली असून त्यांना योजनेतंर्गत ‘होम स्टे’ बांधण्यासाठी तीन लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.
ताडोबाच्या पर्यटकांसाठी बफर क्षेत्रात ‘होम स्टे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:42 PM
ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, तसेच बफर क्षेत्रातील कुटुंबांना शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने चांदा बांदा योजनेतंर्गत बफर क्षेत्रातील नागरिकांना सुसज्ज असे ‘होम स्टे’ बांधून देण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देचांदा ते बांदा योजना तीन लाखांचे अनुदान मिळणार