आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी परिसरात २०१३-१४ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. त्यात अनेक घराची पडझड झाली होती. त्यांना निवाऱ्याची समस्या निर्माण झाली होती. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन ८५ घरे मंजूर केली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविला. मात्र एक वर्ष लोटूनही त्या कुटुंबाना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भंगाराम तळोधी येथील ७० ते ८० नागरिकांनी गोंडपिपरी पंचायत समितीवर धडक दिली.यावेळी नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. भंगाराम तळोधी येथे २०१३-१४ मध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने त्या गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांचे घरे जमीनदोस्त झाली होती. अनेक कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. निवारा उद्ध्वस्त झाल्याने नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. मात्र अद्यापही मदत मिळाली नाही. (वार्ताहर)
घरकूल लाभार्थ्यांची पंचायत समितीवर धडक
By admin | Published: January 08, 2016 1:50 AM