शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पिपरबोडीवासीयांची घरे एम्टाच्या नावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:48 PM

सन २००६ मधे स्थानिक बरांज (मो.) गावालगत कर्नाटक एम्टा कोल माइन्स कंपणी आल्यानंतर पिपरबोडी गावातील मालमत्ता नोंदणी प्रकारात मोठा घोळ झाला. तत्कालीन ग्रामसचिव व विशेष भू-अर्जन अधिकारी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कागदपत्रात हेराफेरी करुन कर्नाटक एम्टा कंपनीचे नाव रेकॉर्डवर चढविले व जुन्या मालमत्ताधारकांचे नमूना आठमधे मालमत्तेचे वर्णन दर्शविले नाही.

ठळक मुद्देग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून मांडली व्यथा : घर विकू शकत नाही, कर्जही घेऊ शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : सन २००६ मधे स्थानिक बरांज (मो.) गावालगत कर्नाटक एम्टा कोल माइन्स कंपणी आल्यानंतर पिपरबोडी गावातील मालमत्ता नोंदणी प्रकारात मोठा घोळ झाला. तत्कालीन ग्रामसचिव व विशेष भू-अर्जन अधिकारी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कागदपत्रात हेराफेरी करुन कर्नाटक एम्टा कंपनीचे नाव रेकॉर्डवर चढविले व जुन्या मालमत्ताधारकांचे नमूना आठमधे मालमत्तेचे वर्णन दर्शविले नाही. यामुळे पिपरबोडीवासींनी आपले राहते घर स्वमालकीचे आहे, हे कसे समजायचे, असा प्रश्न केला. गरज पडल्यास राहते घर विकूही शकत नाही व घरावर कर्जही घेऊ शकत नाही, अशी व्यथा पिपरबोडीवासीयांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.कर्नाटक एम्टा कंपनीच्या प्रकल्पबाधीत क्षेत्रात येत असलेल्या चेकबरांज ग्रामपंचायत अंतर्गत जुनी पिपरबोडी व नवीन पिपरबोडी ही गावे आहेत. कर्नाटक एम्टा कंपनी आल्यानंतर तत्कालीन सचिवांनी चेकबंराज ग्रामपंचायत अंतर्गत पिपरबोडी गटग्रामपंचायतमधील सर्व्हे क्र. ८५/२, ८७/१, ८८/२, ८६/२(ब), मधील मालमत्तेच्या नमूना आठ अ मधे फेरफार करुन मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे वर्णन रेकॉर्डमधून काढून टाकले. यामध्ये तत्कालीन विशेष भू-अर्जन अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली. यामुळे पिपरबोडी येथील मुळ मालमत्ताधारकांची शासकीय रेकॉर्डवर मालमत्तेचे वर्णनसहीत नोंद झाली नाही. तसेच मालमत्ता मोजमापही झाले नाही. सन २०११ मध्ये कर्नाटक एम्टा कोल माईन्स कंपनीच्या नावे फेरफार करण्यात आला. यामधे जवळपास २७६ मालमत्तांचा समावेश असल्याचे पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी सांगितले. ज्या घरात पिपरबोडीवासी आज राहत आहेत, ती त्यांच्या नावावरच नाही.ग्रामस्थांचे नुकसानया प्रकरणात प्लॉटधारकांना मालमत्तेचा कुठलाही मोबदला न देता, कर्नाटक एम्टा कंपनीच्या नावे फेरफार झाल्याने मालमत्ताधारकांचे नुकसान झाले आहे. उलटपक्षी पिपरबोडीवासी मात्र राहत्या घरांचा कर ग्रामपंचायतीमध्ये भरत आहेत. या सर्व प्रकारामुळे पिपरबोडीवासी अधांतरी झालेले आहेत.अन्यथा आंदोलनहा सर्व नमूना आठ मध्ये झालेला घोळ चेकबरांज ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसचिव एम.एस. येवले यांच्या कारकिर्दीत झाला, त्यामुळे या प्रकाराला येवले कारणीभूत आहेत. चौकशी करून दोषीवर कारवाही करून आमचे घर आमच्या नावाने करण्यात यावे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शंकरय्या गुरय्या कॉलनीडी यांनी पत्रपरिषदेत दिला आहे पत्रकार परिषदेला गटग्रामपंचायतचे सदस्य शंकरय्या गुरय्या कॉलनीडी, प्रमोद नागोसे, संतोष कडेलवार, सोमय्या बोनगिरी, गोवर्धन यादव, कुमार रंगास्वामी, सूरज चाफले, आनंदराव सुका, शेखर दोरास्वामी, बाला मेडबलमी, श्रीनिवास बुक्का, सुरेखा कुमरे, अनुसयाबाई सातपुते, हितेंद्र मरसकोल्हे, गिरजाबाई पानघाटे, आदी नारायण कॉलनीडी, गोविंदा कुमरे व गावकरी उपस्थित होते.३०० घरे बोगसचेकबरांज ग्रामपंचायत अंतर्गत मानोरा वार्ड क्र.१ येथील मालमत्ता फेरफारमध्ये गाव नमूना आठच्या रेकॉर्डवर एकूण ९८३ घरे प्रमाणित केले. तत्कालीन सचिवांनी ९८३ घरांपैकी ३०० घरे मोक्यावर नाहीत, अशी नोंद केली. या ३०० घरांना न आढळलेली घरे म्हणून संबोधित केले. व ही ३०० घरे बोगस असूनही प्रमाणित केली. या बोगस घरांना कमी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. कारण या बोगस घरांची कर वसुली होत नसल्याने ग्रामपंचायत रेकॉर्डवर थकबाकी दाखवित आहे. करवसुली होत नसल्याने कर्मचाºयांचे आॅनलाईन पगार थकित होतात, याचा दबाव गावकºयांवर वाढत आहे. त्यामुळे गावातील भौतिक सुविधा बाधित होत आहे. करवसुली थकीत दाखविल्यामुळे गावातील शासकीय सुविधा पूर्ण करण्यास अडचण येत आहे, असेही गावकºयांनी यावेळी सांगितले.