देशासह राज्यातील शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. या लढ्यात गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पोलीस पाटील यांनी जीवावर उदार होऊन गावात अतुलनीय असे काम केले असल्याचे मत ठाणेदार मनोज गभने यांनी यावेळी व्यक्त केले.
पोलीस पाटलांच्या कोरोना काळातील कामगिरीची दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील पोलीस पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभने यांच्या हस्ते तालुक्यातील ४२ पोलीस पाटलांना प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
150921\1554-img-20210915-wa0028.jpg
कोरोना योध्यात पोलीस पाटलांची कामगिरी अतुलनीय
मनोज गभने ठाणेदार
तालुक्यातील पोलीस पाटलांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार