लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतातील ७० टक्के ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी व्यवसायांवर अवलंबून आहे. लाखोंच्या पोशिंद्याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी मानधन योजना सुरु केली. केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या भवितव्याची चिंता आहे. यातूनच शेतकरी मानधन योजना कार्यान्वित करण्यात आली असून योजना शेतकºयांना फायदेशिर असल्याचे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे यांनी बुधवारी नांदगाव (पोडे) येथे केले.बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद देठे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जयंत पोहनकर, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, माजी उपसभापती अनेकश्वर मेश्राम, कृषी मंडळ अधिकारी बी. एस. सलामे, कृषी विस्तार अधिकारी मारोती वरभे, तलाठी शंकुतला कोडापे, कृषी सहाय्यक श्रीकांत ठवरे, उमाकांत बोधे उपस्थित होते. आपले सरकार सेतू केंद्रामार्फत प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेत नोंदणीधारक शेतकºयांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक प्रशांत कसराळे, सरपंचालन श्रीकांत ठवरे तर आभार उमाकांत बोधे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.अशी आहे शेतकरी योजनाशेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी योजना सुरु झाली आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक शेतकºयाला लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांनी वयाच्या ६० वर्षापर्यंत दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करण्याची अट आहे. ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर अल्पभूधारक शेतकºयांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. यासाठी आधार कॉर्ड, बँक ते पासबुक व शेतीचा आठ अ खाते उतारा आवश्यक असून आपले सरकार सेतू केंद्रामार्फत नोंदणी करावी लागणार आहे. लाभार्थीच्या मृत्यूनंतर देखील कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार आहे.शेतकरी मानधन योजनेत १८ वर्षाच्या शेतकऱ्यांने ५५ रुपये महिन्याला जमा केल्यास वर्षाला ६६० रुपये पडते. यानुसार ४२ वर्षाचे २७ हजार ७२० रुपये भरणा करणार ६० वर्षापर्यंत ६० वर्षानंतर वर्षाला ३६ हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतील. त्याच प्रमाणे ४० वर्षाच्या, लाभार्थ्यांने दरमहा २०० रुपये भरणा केल्यास २० वर्षापर्यंत ४८ हजार रुपये भरावे लागती. ६० वर्ष झाल्यावर वार्षिक ३६ हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये लाभार्थ्यांना मृत्यूनंतर वारसाना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे.- प्रशांत कसराळे, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर
मानधन योजना शेतकऱ्यांना फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:21 AM
बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
ठळक मुद्देगोविंदा पोडे : नांदगाव (पोडे) येथे नोंदणी शिबिर