प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारपीठावर पुणे येथील इतिहास तज्ज्ञ गंगाधर बनबरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष दीपक खामनकर, दीपक जेऊरकर, तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, लक्ष्मण घुगुल, विजय मोरे, सारिका जाधव, स्वप्निल मोहुर्ले, संतोष रामगिरवार उपस्थित होते. जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात अभ्यास करून, अर्धसैनिक दलात विशाल ढुमणे, शुभम खवसे, आदर्श उईके, अक्षय गावंडे, दीपक खेडेकर, अजय कन्नाके, तसेच यात एक मुलगी विद्या मोहितकर हिची साठी निवड झाली. कीर्ती घंटावार आणि मोनिका आगलावे या मुलींनी नीट परीक्षेत यश संपादन केले. विशाल शेंडे याला राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला. किशोर कवठे यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी मिळविली. रामरतन चापले यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. दत्तात्रय मोरे, मधुकर बोबडे, बाबुराव पहानपटे हे शिक्षक सेवानिवृत्त झाले. या सर्व मान्यवरांचा प्रमुख मार्गदर्शक गंगाधर बनबरे यांच्या हस्ते शाल, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
आज ज्ञानाचे नव युग तयार झालेले आहे. त्या युगाकडे वाटचाल करणारा नवसमाज निर्माण करणे ही खरी शिवाजी महाराजांना आदरांजली असणार आहे, असे प्रतिपादन गंगाधर बनबरे यांनी आपल्या व्याख्यानात केले. सूत्रसंचालन मधुकर डांगे यांनी केले. जिजाऊ वंदना दिनेश पारखी व संभाजी साळवे यांनी संयुक्त गायिली. आभार संभाजी साळवे यांनी मानले.
शिवजन्मोत्सव व सत्कार समारोहासाठी मधुकर मटाले, लक्ष्मण तुराणकर, दिलीप गिरसावळे, चंद्रकांत भोयर, राजू भोयर, विनोद बोबडे, देविका येमुलवार, सूरज भामरे, प्रतीक कावळे, वैभव अडवे, दिनेश उरकुडे, अनिकेत साळवे यांनी सहकार्य केले.