विजय वडेट्टीवार : विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज वाचनालय सुरू करणारचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील दरवर्षी किमान दहा तरी अधिकारी बनून देशसेवेच्या विकासासाठी हातभार लावावा याकरिता ब्रह्मपुरी येथे सर्व सोयीने युक्त व सुसज्ज वाचनालय लवकरच सुरू करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगट नेता आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथील सिलेब्रशन हॉलमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमात प्रतिपादन केले. ब्रह्मपुरी येथील प्रभादेवी लोढीया सिलेब्रशन हॉल येथे आ. वडेट्टीवार यांच्या हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून सहायक संचालक प्रशांत वावगे व प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सेलोरकर, प्राचार्य डॉ. नामदेव कोकाडे, प्राचार्य देवेश कांबळे, प्राचार्य डॉ. आमिर धम्मानी, प.स. सभापती नेताजी मेश्राम, प्राचार्य डॉ. राजेश कांबळे, सतीश कावळे, अध्यक्ष शहर काँग्रेस ब्रह्मपुरी, विलास विखार सरचिटणीस जिल्हा काँग्रेस, थानेश्वर कायरकर, मनोज कावळे, रेश्मा खानोरकर, नगरसेविका, उमेश धोटे यांच्यासह अनेक मान्यवर पालक विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार
By admin | Published: June 29, 2016 1:14 AM