शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

घोडाझरी तलावाला गोसीखुर्दच्या पाण्याची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:57 PM

घोडाझरी तलावाच्या सौंदर्यीकरणावर भर देऊन शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्याऐवजी तलावाचा कालवा बांधून गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ....

ठळक मुद्देशेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित : नियोजनाअभावी सिंदेवाही तालुक्यातील शेकडो शेतकºयांचे नुकसान

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी तलावाच्या सौंदर्यीकरणावर भर देऊन शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्याऐवजी तलावाचा कालवा बांधून गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास शेतकºयांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे.घोडाझरी तलावाचे सौंदर्यीकरण करणे व पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी प्रशासनाने खासगी कंपनीला कंत्राट देऊन बोटिंगची व्यवस्था केली. बोटिंग आणि रिसोर्टच्या माध्यमातून लाखो रुपये मिळतात. पर्यटक इथे येण्यासाठी आतूर असतात. नागभीड-तळोधी मार्गावरील घोडाझरी फाट्यावर भव्य-दिव्य प्रवेशद्वाराची उभारणीही सुरू आहे. याला कुणाचा विरोध नाही. परंतु हे करत असताना मुख्य उद्देशांकडे दुर्लक्ष होऊ नये. इंग्रजांनी उदात्त हेतुने शेतकरी हा केंद्रबिंदु मानला. स्वातंत्र्याच्या ६५-७० वर्षांतच त्याकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकºयांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घोडाझरी नहराचे कालवे ज्या-ज्या भागात गेले आहेत. त्या सर्व कालव्यांची दरवर्षी मे-जून महिण्यातच कचरा काढणे, गाळ काढणे आणि ज्या ठिकाणी कालवा फुटू शकतो, त्या भागाची डागडुजी करणे आवश्यक आहे. कालव्याच्या दोन्ही भागांवर दरवर्षी मुरूम-माती टाकण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु सिमेंट लायकिंगचे काम करताना दोन-अडीच इंचीचा थर मुरूम टाकून त्यावरच काम करण्यात आले. सिमेंटला पकड मजबूत करण्याने आणि खरे ते घराला करतात, तसे प्लॉस्टर असल्याने पहिल्याच वर्षी बºयाच ठिकाणी पाण्याबरोबर वाहुन गेले. पाण्याअभावी पक्के न झाल्याने भेगाही गेल्या आहेत. नवरगाव-गडबोरीकडे येणाºया कालव्याचीही दैनावस्था आहे. पूर्वी याच कालव्यासह दरवर्षी मुरूम कालव्याच्या दोन्ही भागावर पसरविल्या जात होता. घोडाझरी सिंचन शाखेला परवडते की नाही. मात्र बºयाच वर्र्षापासून त्यावर मुरूमही टाकल्या जात नाही. त्यामुळे कालव्याची उंचीच कमी झाली. या कालव्याच्या माध्यमातून जास्त पाणी आणणे धोकादायक ठरले आहे.कालव्याच्या जवळ असलेल्या शेतकºयांना दोन-तीनदा पाणी मिळते. ज्या ठिकाणी उपवितरिका आहेत. त्याही लांब अंतरावर बांधण्यात आल्या. दोन महिने कालव्याने पाणी येत असले तरी शेवटच्या टोकाकडे पोहचत नाही. परिणामी, शेतकºयांची गोची होत आहे. शिवाय या दरवर्षीच्या त्रासाला कंटाळून मोठ्या शेतकºयांनी स्वत:च्या शेतामध्ये बोरवेल खोदल्या ते आता संबंधीत विभागाकडे तक्रार करण्यास येत नाहीत.शेवटच्या शेतकºयाने मेहनत करून पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास काही मधले शेतकरी पाणी अडवतात. त्यामुळे शेवटचे शेतकरी पाणसारा देतात. परंतू भांडण नको, असे म्हणत शांत राहातात. पूर्वी सर्वच शेतकºयांना पाण्याची गरज पडत असल्याने पाच-पन्नास शेतकरी एकत्र होऊन संबंधित कार्यालयात येऊन अधिकाºयांना पाण्याचा गेज वाढविण्यास बाध्य करीत होते. अलीकडे शेतकºयांमध्ये तशी एकीची भावना दिसत नाही. कुणी शेतकरी कार्यालयापर्यंत येण्यास धजावत नाही. धाडस करून काही शेतकरी कार्यालयास गेल्यास संबंधित अधिकाºयांची भेट होत नाही. त्यामुळेही अधिकारी, कंत्राटदार व त्यांचे सहकार्य पाणी वाटप करताना दुर्लक्ष करतात.शेतीच्या जवळच हक्काचे पाणी असूनही त्यापासून वंचित राहाण्याची पाळी शेतकºयांवर येत आहे. पीक उभे असताना पाणी मिळत नाही. तसेच पाणीकर वसुलीवरही याचा परिणाम होत आहे. शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि शासनालाही महसूल मिळावा, या हेतूने विकासाची कामे केली. तलाव उभारला. मात्र, चुकीच्या नियोजन तसेच नेते आणि भ्रष्ट अधिकाºयांच्या संगणमताने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. उत्पन्नही कमी होत असल्याचे दिसून येते. शेतकºयांचे दीर्घकालीन हित लक्षात लोकप्रतिनिधींनी गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात आणण्यासाठी पुढाकार घेणे आता काळाची गरज निर्माण झाली आहे.