शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

घरकुलासाठी जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:11 PM

घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्देशेकडो लाभार्थ्यांचा सहभाग : घरकुलाचा तात्काळ लाभ द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.जैन भवनजवळून निघालेल्या या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी बोलताना किशोर जोरगेवार म्हणाले, अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी येथील नागरिकांची अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची क्षमता अद्याप लोप पावलेली नाही. त्यामुळे आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्याची चुक करु नका, आमचा अधिकार हक्काने द्या, अन्यथा रस्त्यावर उतरुन संघर्षातून मिळवू, असा इशाराही त्यांनी दिला.हक्काच घर मिळालेच पाहिजे, असा नारा बुलंद करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाच्या मार्गावरील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, इंदिरा गांधी यांच्या पुतळयाला जोरगेवार यांनी माल्यार्पण केले.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच जोरगेवार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत तत्काळ बैठक लावण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले.यावेळी विनोद अनंतवार, सुनील पाटील, अमोल शेंडे, देविदास बानबले, इरफान शेख, सलीम मामू, कांबळेजी, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी आदींची उपस्थिती होती.अशी केली थट्टाघरकूल योजनेच्या नावावर शासनाने २१ हजार ७९५ हून अधिक नागरिकांडून अर्ज भरुन घेतले. यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. तर दोन हजार २२२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र यात लाभार्थी ठरलेल्यांना अद्याप घराचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी असूनही हक्काच घर प्रत्यक्षात साकार झालेल नाही. ही या लाभार्थ्यांची एक प्रकारे थट्टा असून शासनाने नागरिकांना फक्त घराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये रोष आहें. एकीकडे योजनेतील हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्या जात आहे. तर दुसरीकडे असलेले घरही नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे, असा आरोप किशोर जोरगेवार यांनी यावेळी केला.या आहेत मागण्याघरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधून देण्यात यावे, या योजनेतील अटी शिथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जदारांनाही घकुलाचा लाभ देण्यात यावा, या योजनेची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नझूलच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना स्थायीस्वरुपी पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.