कोरोनामुळे मागील वर्षीच्या इयत्तेतील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला आहे. सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले; परंतु, काही विद्यार्थ्यी असंतुष्ट दिसत आहेत. मला कमी आणि त्याला कसे जास्त, अशी आपआपसांत चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
परीक्षा नाही आणि पूनर्मूल्यांकनही नाही
कोरोनामुळे २०२०-२१ व त्यानंतर २१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गुणांकनाबाबत असमाधान आहे. अशांना पुनर्मूल्यांकनाचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.
बॉक्स
मी त्याच्यापेक्षा हुशार मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?
बारावी हा विद्यार्थ्यांचा आयुष्याचा टर्निंग पाॅईंट समजला जातो. त्यामुळे विद्यार्थी बारावीसाठी कसून अभ्यास करत असतात तसेच त्यानंतर ज्या अभ्यासक्रमांची निवड करणार आहेत. त्याची तयारी करत असतात परंतु, यंदा बारावीची परीक्षाविनाच पास करण्यात आले आहे. त्यामुळे कोणाला कमी तर कोणाला अधिक गुण मिळाले आहेत. अशावेळी हुशार विद्यार्थी माझ्यापेक्षा तुला जास्त गुण कसे मिळाले, असा प्रश्न विचारताना दिसून येत आहेत.
बॉक्स
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...
परीक्षा न घेताच मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. प्रत्येकालाच भरघोस गुण मिळाले आहे. मात्र, अशा मूल्यांकनावरून विद्यार्थ्यांची खरी क्षमता कळू शकत नाही.
रूपेश कोसनकार पालक
------
ऑनलाईन शिक्षण सुरू होते तरी हुशार विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास केला. याव्यतिरिक्त ज्या उनाड मुलांनी अभ्यास केला नाही, त्यांनासुद्धा या पद्धतीने चांगले गुण मिळाल्याने हुशार मुलांचे नुकसान झाले.
प्रशांत रायपुरे, पालक
------
विद्यार्थी म्हणतात...
ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने व कॉलेज बंद असल्याने अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला. प्रामाणिक अभ्यास केला; परंतु, परीक्षाच झाली नाही. त्यामुळे स्वत:ची क्षमताच कळू शकली नाही.
- संजना परमार, विद्यार्थी
बारावीत सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. सगळ्यांनाच समान गुण असल्याने हुशार विद्यार्थी गोंधळात आहे.
रंजू नागापुरे, विद्यार्थी