चंद्रपूर : आयुष्याचा टर्निंग पाईंट म्हणून दहावी आणि बारावीकडे बघितल्या जाते. हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून करिअरची दिशा ठरते. मात्र यावर्षी दोन्ही वर्गाची परीक्षाच झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम अधिकच वाढला असून पुढील प्रवेश कसा घ्यायचा, कोणते क्षेत्र निवडायचे असे एक ना अनेक प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना पडले आहे.
कोरोना सकंटामुळे यावर्षी प्रत्येक जण अडचणीत आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. प्राथमिक शाळांना तर वर्षभर सुटीच होती. पुढील वर्गांना ऑनलाइन अभ्यासक्रमांचा आधार मिळाला. मात्र ग्रामीण भागातील स्थिती बिकटच होती. त्यातच कोरोनाने पुन्हा तोंड वर काढल्यामुळे दहावीबरोबर आता बारावीचीही परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा भार कमी झाला असला तरी पुढील प्रवेशाचा नवा ताण त्यांना आला आहे. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांच्यामध्ये संभ्रम असल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे सध्यातरी गरजेचे आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी -२८९८९
बाॅक्स
बारावीनंतर पुढील संधी
बारावीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून करिअर करता येते. यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीसोबतच अन्य क्षेत्राचे मार्गही विद्यार्थ्यांसाठी खुले होतात. यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र, पॅरामेडिकल, पशुवैद्यक, बायोटेक्नाॅलाजी, औषधनिर्माणशास्त्र, ऑर्किटेक्चर, कृषीक्षेत्र, फॅशन डिझायनिंग, संरक्षण दल, लघु उद्योग क्षेत्र, फाईन आर्टस, बीसीए, बीबीए, मनोरंजन क्षेत्र, संशोधन क्षेत्र, हाॅटेल मॅनेजमेंट, मर्चंट नेव्ही या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रही विद्यार्थ्यांची खुले आहेत. ज्या क्षेत्रात अधिक आवड आहे, ते क्षेत्र निवडता येते.
कोट
कोरोना संकटामुळे यावर्षी दहावी नंतर आता बारावीचीही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. १२ वीचे गुण देताना मागील ३ वर्षांचे मूल्यमापन करून त्यानुसार गुण दिल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. जे निकष शासन ठरवून देईल त्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून गुण मिळणार आहे. यानुसार पुढील प्रवेश निश्चित होणार आहे. जेईई किंवा निटची परीक्षा ऑनलाइन घेऊ शकतात किंवा पूर्वीप्रमाणे बारावीच्या गुणांनुसारही प्रवेश प्रक्रिया होऊ शकते.
-अशोक जिवतोडे
प्राचार्य, जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर
कोट
बारावीची परीक्षा रद्द झाली. मात्र अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुणांकन द्यायचे हे स्पष्ट झाले नाही. मूल्यांकन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळतील. त्यानंतर त्यांना पुढील वर्षात प्रवेश घेता येणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा होण्याची शक्यता आहे.
-ए. चंद्रमौली
प्राचार्य, आरएमजीम काॅलेज, सावली
--
विद्यार्थी म्हणतात....
बारावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे पुढील प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. मूल्यांकनानुसार गुण दिले तरीही ते कसे मिळणार, देण्याची पद्धत कशी असेल, गुण कमी मिळण्याचीही भीती आहे. त्यात पुढील वर्गात प्रवेश कसा घ्यायचा, क्षेत्र कसे निवडायचे आदी प्रश्न सध्या पडले आहे.
-अजय कोडापे
विद्यार्थी
कोट
मागील वर्षभरापासून कोरोना संकट असल्यामुळे परीक्षेबाबत संभ्रम होता. आता परीक्षा रद्द झाली. मात्र पुढील प्रवेशासंदर्भात अजूनही निर्णय झाला नाही. त्यामुळे गुण कसे मिळणार आणि कोणते क्षेत्र निवडायचे अद्यापही ठरविलेले नाही.
प्राजक्ता राऊत
विद्यार्थिनी
---
मुलाच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालक, मुलगा, मुलगी शाळेत जायला लागल्यानंतर त्याच्याकरिअरचा निर्णय घेतात. दहावी, बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात जायचे याची निवड केली जाते. पण विद्यार्थ्यांची क्षमता त्याची आवडही विचारात घेणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या आवडीनुसार त्याला त्याचे क्षेत्र निवडू द्या, म्हणजे, भविष्यात त्याला अडचणी जाणार नाही.