चंद्रपूर : कोरोना संकटकाळामध्ये आरोग्य यंत्रणेसह पोलीस कर्मचाऱ्यांवरही मोठा ताण आला आहे. आरोग्य तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना दिवसरात्र काम करावे लागत आहे. रात्री-बेरात्री कामावर जावे लागत असल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक ताण येत आहे. यासाठी वरिष्ठांनी काळजी घेतली असून, कमीत कमी ताण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र सध्याची परिस्थिती गंभीर असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले कर्तव्य पार पाडावेच लागत आहे.
एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे कुटुंबीय अशी परिस्थितीत पोलीस तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र अनेकवेळा नागरिकही ऐकत नसल्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे.
कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी पोलिसांसाठी विविध शिबिरे घेण्यात येत आहेत. दरम्यान, लाॅकडाऊन काळातचही गुन्हेगारांना अटक करणे, चोरीच्या घटनांवर आळा घालणे, हत्या, मारामारी, कौटुंबिक कलह आदी घटना मात्र सातत्याने घडतच आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दहशतीमध्ये या घटनांमुळेही पोलिसांना चांगलाच मानसिक ताण येत आहे. त्यामुळे नागरिकांनी किमान संकटाच्या काळात तरी आपली जबाबदारी समजून पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
आरोग्य कर्मचारी -
डाॅक्टर-
एकूण पोलीस
एकूण अधिकारी
--कोट
कुटुंब अन् नोकरी सांभाळण्याची कसरत
कोरोनामुळे सर्वत्र दहशत आहे. अशावेळी कुटुंबीयांनाही आमची काळजी वाटते. अनेकवेळा रस्त्यावर उभे राहून नागरिकांकडे लक्ष ठेवावे लागते. कोण माणूस कसा येईल ते सांगता येत नाही. अनेकवेळा काही जण हुज्जत घालतात. पाहून घेण्याचेही बोलतात. मात्र आम्ही आमचे कर्तव्य चोख पार पाडत असतो.
-पोलीस कर्मचारी
कोट
प्रत्येकांनी जागरुक राहून आपले कर्तव्य पार पाडले तर कोरोनाच्या संकटालाही आपण हरवू शकतो. मात्र काही जण आजही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. अशावेळी त्यांना पोलिसी खाक्या दाखवावा लागतो. घरी मुलंबाळ असतात. आम्ही दिवसभर आणि कधी कधी रात्रभरसुद्धा कर्तव्यावर असतो. त्यामुळे पत्नी, आई, वडील सारखे काळजीत असतात.
पोलीस कर्मचारी.
-
रुग्णांची सेवा करताना आम्हालाही कोरोनाचा धोका होऊ शकतो. मात्र आम्ही योग्य काळजी घेऊन आपले कर्तव्य पार पाडत आहोत. मात्र कुटुंबीयांचीही काळजी आहेच. सध्या रुग्णसंख्या वाढल्यामुळे कामाचा ताण आहे. मात्र यातूनही आपण नक्कीच बाहेर पडू असा विश्वास आहे. कुटुंबीयांची काळजी सतावत आहे. त्यांना वेळ देता येत नसल्याचेही दु:ख आहे.
- आरोग्य कर्मचारी
---
प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाशी लढताना काय काळजी घ्यायला हवी यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करण्यासंदर्भात सांगितले जात आहे. एवढेच नाही तर काळाच्या वेळेव्यतिरिक्त आपापले छंद जोपासण्याबाबतची सूट देण्यात आली आहे. बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना पाणी, जेवण वेळेवर मिळेल याची काळजी घेतली जात आहे.
-अरविंद साळवे
जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर