चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंध कमी करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात विशेष रेल्वे धावत आहेत. परंतु, या रेल्वेसाठी केवळ तिकीट आरक्षित केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना १५० रुपये अतिरिक्त देऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी जवळचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मार्च महिन्यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. पहिल्यांदाच सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. सुमारे पाच ते सहा महिन्यानंतर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु, अद्यापही लोकल तसेच अन्य रेल्वे सुरु करण्यात आल्या नाही.
त्यामुळे रेल्वेने जवळचा प्रवास करायचा असेल तरी विशेष रेल्वेचाच वापर करावा लागत आहे. या रेल्वेमध्ये स्थानकावरील स्पॅाट तिकीट देणे बंद आहे. प्रवाशांना एक दिवसाअगोदर ॲानलाईन किंवा स्थानकावर जाऊन तिकीट आरक्षित करणे गरजेचे आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना दीडशे रुपये अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही लूट थांबवण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
बॉक्स
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
कोरोनाच्या पूर्वी रेल्वेच्या १६० फेऱ्या व्हायच्या. मात्र कोरोनाने केवळ विशेष ट्रेन सुरु असून २० ट्रेनच्या ४० फेऱ्या होत आहे. परंतु, यासाठी केवळ आरक्षित तिकीट घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त स्पॉट तिकीट देणे बंद आहे.
रेल्वेने वर्धा, नागपूर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु, आता या प्रवाशांसाठी लोकल ट्रेन नसल्याने त्यांना विशेष रेल्वेनेच प्रवास करावा लागत आहे. मात्र त्यासाठी १५० रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहे. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करावी, अशी मागणी आहे.
बॉक्स
तिकिटात फरक किती ?
रेल्वेचे तिकीट कमी असल्याचे अनेकजण रेल्वेने प्रवास करायचे. मात्र आता केवळ विशेष रेल्वे सुरु असून दीडशे रुपये अतिरिक्त देऊन प्रवास करावा लागत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे
नवजीवन एक्स्प्रेस
तामिळनाडू एक्स्प्रेस,
जीटी एक्स्प्रेस,
हमसफर एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस,
दक्षिण रेल्वे,
नवजीवन एक्स्प्रेस,
तामिळनाडू एक्स्प्रेस,
तेलंगणा एक्स्प्रेस
बॉक्स
प्रवाशी म्हणतात....
वर्धा, नागपूर येथे जाण्यासाठी प्रवाशांना रेल्वे सोयीची होती. मात्र आता केवळ विशेष रेल्वे सुरु असून प्रवाशांना १५० रुपये अतिरिक्त देऊन तिकीट आरक्षित करावी लागत आहे. भुर्दंड बसत असल्याने तिकीट आरक्षण रद्द करणे गरजेचे आहे.
- सागर राऊत, बल्लारपूर
-------
कोरोनाने लोकल रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचण जात आहे. विशेष रेल्वे सुरु केल्या असून त्याची तिकीट आरक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.
- राकेश कांबळे, बल्लारपूर