लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हैदराबाद येथील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला पेटवून देण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, हे चारही आरोपी पोलिसांच्याच तावडीतून पळून जात असताना पोलिसांनी एन्काऊंटर केले. पोलिसांच्या या कारवाईबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या नागरिकांनी बलात्काऱ्यांना अशीच किंबहुना यापेक्षाही आणखी कडक शिक्षा व्हायला पाहिजे होती, असे काहींचे म्हणणे होते. तर काहींनी एन्काऊंटर हा मार्ग नसून यामुळे अराजकता निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली.एन्काऊंटरमुळे न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. अनेकवेळा कायद्यातील पळवाटांमुळे आरोपी सुटतात. त्यामुळे कायदा अधिकाधिक कडक करून आरोपींवर त्वरित कारवाई व्हायला हवी. जेणेकरून असा प्रकार करण्याची कुणीही हिंम्मत करणार नाही.- स्मिता जिवतोडे, संचालिका,चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूरतेलंगणा पोलिसांनी जे काम आज केले त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. पोलिसांनी त्या बलात्काºयांना भरचौकात मारायला पाहिजे होते. म्हणजे, यापुढे इतर कुणीही असे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही. सोबतच या प्रकरणातील कायदेही अधिकाधिक कडक करणे गरजेचे आहे.- प्रतिमा ठाकूर, शहरअध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरभारतीय इतिहासातील अभूतपूर्व अशी घटना घडली आहे. एन्काऊंटरपेक्षा भर चौकामध्ये त्यांना फाशी द्यायला हवी होती. म्हणजे, पुढे असे घृणकृत्ये करण्याची हिम्मत करणार नाही. निर्भया प्रकरणातील आरोपींना अद्यापही शिक्षा झाली नसून न्याय मिळाला नाही. त्या आरोपींनाही अशीच शिक्षा व्हायवी हवी.- अनिता बोबडे, शिक्षिका,न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूरहैद्राबाद येथील बलत्काऱ्यांच्या बाबतीत तेलंगणा येथील पोलिसांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. भारत सरकारने पण आता अशा गुन्ह्यासाठी कायदा कडक करण्याची गरज आहे. असे झाले तर असे कृत्य कोणी करणार नाही- विनोद धाकूनकर, नगरसेवक, चिमूर.हैद्राबादमधील बलात्कार प्रकरण अमानवीय आणि माणूसकीला काळीमा फासणारे होते. त्याचा निषेधच केला पाहिजे. पण आज ज्याप्रमाणे पोलिसांनी कार्यवाही केली ती चुकीची आहे. कारण या देशात संविधान आणि कायदा आहे. आरोपी कोण हे ठरविण्याचा अधिकार हा न्यायपालिकेचा आहे. पोलिसांचा नाही. तसेच आर्टिकल २१ जीवनाची व स्वातंत्र्याची हमी देतो. यातून वेगळा संदेश समाजात व देशात जाऊ शकतो.- आशिष झाडे, चिमूर.बलात्कार प्रकरणात पोलिसांनी केलेली कार्यवाहीचे स्वागत आहे. आज आपल्या देशात महिला पूर्णपणे सुरक्षित नाही. सतत होत असलेल्या अशा घटनेमुळे मन विचलित होते. कायद्याचा धाक नसल्याने अशा घटना देशात घडत आहे. आज खºया अर्थाने पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला.- महेश काहीलकर, चंद्रपूर.देशात भारतीय संविधान सर्वतोपरी आहे. कुणी संशयित आरोपी असला तरीही त्याला घटनेच्या अनुच्छेद २१ अन्वये जीवनाचा अधिकार नाकारता येत नाही. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा करण्याचा अधिकार न्यायालयालादेखील नाही. अटक केलेले इसम पोलीस कोठडीत असताना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही पोलिसांवर असते. त्यामुळे अटकेतील इसम हे पळून जात होते ही संपूर्णपणे बेकायदेशीर व बनावट पळवाट आहे. हैदराबाद येथील घटनेत प्रथमदर्शनी जनता व राजकीय दबावात तसेच पुढील तपासाची जबाबदारी झटकण्यासाठी, तसेच पुरावे जमवण्यातील क्लिष्टता बघता पोलिसानी बनावट एन्काऊंटर केल्याचे दिसत आहे. यामुळे कायद्याचे राज्य संपून देशात अराजकता माजेल. संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी आवश्यक आहे.- अॅड. भुपेश वामनराव पाटीलअधिवक्ता, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ/चिमूर.पोलिसांनी केलेली कारवाई ऐकून आनंद झाला. बलात्काºयांना अशीच शिक्षा पाहिजे होती. सर्व बलात्काºयांना अशीच शिक्षा व्हायला हवी. तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन.- सीमा वनकर, चंद्रपूर.हैदराबाद येथील बलात्कारातील आरोपींचे पोलिसांनी केलेले एन्काऊंटर यामुळे समाधान वाटले. पोलिसांनी अभिनंदन करायला पाहिजे. महिलांनाच अशा प्रकरणात शिक्षा देण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्यादृष्टीने महिलांना प्रशिक्षण दिले पाहिजे.- सरिता मालू, चंद्रपूर.देशात आजही महिला असुरक्षित आहेत. बलात्कार व खून करणाºया आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. ही शिक्षा फारच कमी आहे. त्यापेक्षा त्यांना फासावरच अटकविले पाहिजे होते.- सुषमा नगराळे, चंद्रपूर.तेलंगणा पोलिसांनी केलेल्या आरोपींच्या एन्काऊंटरमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशा कारवायामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल. निर्भया प्रकरणातही असाच न्याय व्हायला हवा.- मंगला रुद्रापवार, चंद्रपूर
बलात्काऱ्यांना अशीच शिक्षा हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 6:00 AM
एन्काऊंटरमुळे न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. अनेकवेळा कायद्यातील पळवाटांमुळे आरोपी सुटतात. त्यामुळे कायदा अधिकाधिक कडक करून आरोपींवर त्वरित कारवाई व्हायला हवी. जेणेकरून असा प्रकार करण्याची कुणीही हिंम्मत करणार नाही.
ठळक मुद्देनागरिकांचा सूर : मात्र एन्काऊंटर हा मार्ग नसल्याची काहींची खंत