बॉक्स
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई नाही
चंद्रपूर शहरात पूर्वी मनपा कर्मचारी, पोलीस पथक चौकाचौकात उभे राहून विनामास्क फिरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत होती; मात्र आता ही मोहीम थंडावली आहे.
वाहतूक पोलीस चौका-चौकात दिसून येतात; मात्र विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करताना दिसून येत नाही. तर मनपाचे पथक एखाद्याच दिवशी कारवाईची मोहीम राबवित असते.
बॉक्स
पोलिसांचाही मास्क तोंडाखाली
शहरातील चौका-चौकात अनेक पोलिसाचे पथक दिसून येतात. यातील काहीच पोलिसांच्या तोंडावर मास्क दिसून येतो. याव्यतिरिक्त इतर पोलिसांचे मास्क हे तोंडाखाली असल्याचे दिसून आले. दिवसभर उभे राहून कर्तव्य बजावत असल्याने सारखा तोंडाला मास्क लावणे अशक्य आहे. अन्यथा इतरवेळ मास्क घालून असतात.
बॉक्स
काळजी घेणे गरजेचे
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु, तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण तिसऱ्या लाटेला रोखू शकतो.