लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : या वर्षी जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला. त्यामुळे ग्राहकही मोठ्या आवडीने आंबे खरेदी करीत आहेत. मात्र आंबे खरेदी करताना ते नैसर्गिकरीत्या पिकलेले आहेत की कृत्रिम, हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाला पडत आहे. त्यामुळे आंबे घेतानाही प्रथम ते कृत्रिम पिकविलेले आहेत का, हे बघूनच घ्यावे. कृत्रिम रसायनांनी पिकविलेल्या आंब्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
रसायनांनी पिकवलेले आंबे कसे ओळखाल?कॅल्शिअम कार्बाइडने पिकवलेली फळे घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही.फळांमध्ये योग्य ती पिकविण्याची प्रक्रिया न झाल्याने ती चवीला आंबट किंवा चवहीन असतात. पूर्णतः पिकलेले वाटणारे, पण तेवढेच हे आंबे घट्ट असतात.
कोणती फळे खाण्यास योग्य असतात?जैवरासायनिक प्रक्रिया झालेली आंब्यांसह इतर फळे खाण्यास योग्य असतात. यात कच्चे फळ ८ ते १० प्रक्रियेतून जात असते. यात रंग येणे, स्वाद निर्माण होणे, साखरेचे प्रमाण वाढणे, आम्लता कमी होणे, मऊपणा येणे अशी लक्षणे आंबे व इतर फळांमध्ये दिसल्यास ही फळे खाण्यायोग्य असतात. त्यामुळे कृत्रीमरीत्या पिकवलेली फळे टाळावीत.
असे ओळखा आंबे?इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनांमुळे पिकणारी फळे थोडी मऊ असतात, तसेच या फळांना विशिष्ट सुवास असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किवा केशरी रंगाचा असतो.
कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे घातक■ रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे खाल्ल्यास आतड्यांचे गंभीर आजार, पोटातील अल्सर, डोकेदुखी, चक्कर, विस्मरण, झोप उडणे यासारखे आजार होऊ शकतात.
■ गर्भवतींना होणाऱ्या बाळाला त्याचा अपाय होतो. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून मधुमेह, हायपोथायरॉईड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. कर्करोग यांसारख्या आजारांची भीती असते. बाजारपेठेत हंगामा- पूर्वीच उपलब्ध होणारी फळे रसायनामध्ये पिकवलेली असतात.
असे आहेत आंब्याचे दर
हापूस ६०० ते ९००केसर १६० ते १८०दशहरी १०० ते १५० रु.लंगडा १०० ते ११० रु.