मागील वर्षी जिल्ह्यात मार्च महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे दहावीचा एक विषय तसेच अन्य वर्गाच्या परीक्षा झाल्या नाही. लॉकडाऊन नंतर कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर शाळा पूर्णपणे बंद होत्या. मध्यंतरी ९ ते १२ चे वर्ग सुरू करण्यात आले. तर २७ जानेवारीपासून ५ ते ८वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र हे वर्गही नियमित झाले नाही. त्यातच आता दहावी तसेच बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आले आहे. मात्र स्पर्धाच झाल्या नसल्याने क्रीडा गुण मिळणार कसे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात काेरोना बाधितांचा आकडा २७ हजारांवर पोहचला आहे. कोरोना संसर्गापासून विद्यार्थी सुरक्षित राहावे, यासाठी गतवर्षी नवे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात आले नाही. यासह गर्दी टाळण्यासाठी खेळांची मैदानेही बंद ठेवण्यात आली. जिल्हास्तर, राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजनच करण्यात आले नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीमधील खेळाडू विद्यार्थी यंदा क्रीडा सवलत गुणास मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
चालू वर्षीही खेळांवर संकट
मागील काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शेजारील जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही लाॅकडाऊनची स्थिती उद्भवत आहे. यामुळे आजही मैंदानी क्रीडा स्पर्धा सुरू झालेल्या नाहीत. विविध प्रकारच्या खेळांवर यामुळे संकट कोसळले आहे. खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये सध्या नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यार्थी काय म्हणतात
कोट
कोरोना विषाणूमुळे यावर्षी शाळा सुरू झाल्या नाही. परिणामी मैदानी स्पर्धांवरही बंधने आली आहे. त्यामुळे यावर्षी क्रीडा गुण सवलत मिळणार नसल्याची शक्यता आहे. शासनाने पूर्वीच्या स्पर्धांचा विचार करून क्रीडा गुणासाठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे.
सोनल पिसे, चंद्रपूरकोट
अभ्यासासोबत क्रीडा सपर्धामध्ये दिलेले योगदान लक्षा घेता विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण मिळायला हवे. यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, शिवाय त्यांचे नुकसानही होणार नाही.
-ओम भगत,चंद्रपूर
कोट
दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण मिळण्यासंदर्भात सध्या संभ्रम आहे. मात्र नवव्या वर्गाच्या क्रीडा स्पर्धांनुसार त्यांना क्रीडा गुण दिल्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थ्यांचे योगदान लक्षात घेऊन शासनाने विचार करायला हवा.
साहिल सहारे, क्रीडा शिक्षक, चंद्रपूर
-