राजुरा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राजुरा विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींची विकासकामे खेचून आणणारे आमदार सुभाष धोटे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात जिवती सारख्या दुर्गम तालुक्यात कोट्यवधींची विकास कामे खेचून आणले. यामध्ये सिंचन, कृषी, आरोग्य, पिण्याचे पाणी, याकडे प्राधान्याने लक्ष देवून तालुक्यात विकासाची गंगा आणल्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिवती तालुक्यातील शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवार (दि.२४) काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे आश्वासन दिले. पक्ष बळकटीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सरकारचे ध्येय धोरणे घराघरात पोहचवावे, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले. कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे संगठण मजबूत झाले आहे. पाटण येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला जिवती तालुका अध्यक्ष गोदरु पाटील जुमनाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पांडुरंग जाधव, उपसभापती सुग्रीव गोतावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पा. मडावी, माजी जि.प. सदस्या, प्रिया सोनकांबळे, शेख ताजुद्दीन, मुनीर शेख, ममता जाधव, भिमराव पवार, अशपाक शेख, आदींची उपस्थिती होती.यावेळी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व आप पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. शेणगाव येथील माजी पंचायत समिती सभापती दत्ता किसन माने, मल्लीकाअर्जुन खंदारे, तातेराव कांबळे, केशव गवाळे, केकेझरी येथील वैजनाथ बेरले, भोक्सापूर बैजनाथ मंगणार, पालडोर येथील बैजनाथ सावरगावे, जनकापूर येथील संतोष राठोड, जनार्धन राठोड, विवेक राठोड, बालाजी कांबळे, विनोद राठोड, संजय राठोड, पालडोह अंबादास पवार, सखाराम पवार, भारीचे सरपंच देवेंद्र तुरणकर, दत्ता रावसाहेब पोले, केशव खटके, प्रभाकर पेंदोर, हिमायत नगर येथील जगन नलबले, पितांबर साधणे, शंकर पळ, बाबुराव नलबले, परमेश्वर उपरवार, रामा गुडलू, जगन भुकटवाड, धोंडीबा करेवाड, दिनानाथ राबणे, बालाजी पुरडवार, बालाजी नरबले, ज्ञानोबा मोरे, जयतू आत्राम, चिनू आत्राम, अंबादास पवार, सखाराम पवार, चिखली नाईकनगर अरुण चव्हाण, सुरेश सलमा, चावली जाधव, कमला पवार, सुमन आडे, चांगोणाबाई पवार, मालन राठोड, केकेझरी केशव सूर्यवंशी, विशाल गायमुखले, दत्ता कांबळे, करण वाघमारे, अनिल वाघमारे, अरविंद गायकवाड, टाटा कोहाड येथील शिवसेनेमधून भक्तराम मेश्राम, मारोती मदनगुले, प्रेमदास जाधव, मारोती जाधव, किसन आत्राम, अशोक सहारे, अरुण चव्हाण, पल्लेझरी येथील केशव काजगुडे, दत्ता देवकते, नामदेव जाधव, दसरु आत्राम, व्यकंटी राठोड, देवीदास राठोड, देवीदास बाळू राठोड, संभा चव्हाण, अशोक आडे, निलकंट कर्ले, शिवाजी करेवाड, दत्ता कोंबडे, आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी आमदार सुभाष धोटे व तालुका अध्यक्ष गोदरु पाटील जुमनाके यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)
शेकडो कार्यकर्त्यांचा काँंग्रेसमध्ये प्रवेश
By admin | Published: August 25, 2014 11:54 PM