लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप जवळील बाबळीचे झाड तोडल्याने झाडावरील पक्ष्यांची ५० ते ६० घरटी उद्धवस्त झाली. यात शेकडो पक्ष्यांची पिल्ले मृत पावली असून अनेक अंडी खाली पडल्याने फूटली. यामुळे या झाडावरील घरट्यात असणारे शेकडो बगळे व अन्य पक्षी आपल्या पिल्ल्यांना वाचून पोरकी झाली. त्यामुळे नगर परिषद वन्यपक्षाच्या जिवावर उठल्याचे चित्र दिसत आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.पावसाची सुरूवात झाली की पक्ष्यांचा प्रजनन काळ सुरु होतो. त्यामुळे पावसात पक्षी झाडावर आपली घरटी बांधून त्यात अंडी घालण्यास सुरुवात करतात. त्यामुळे अनेक झाडावर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची घरटी बघायला मिळते. वनविभाग कोट्यवधी वृक्ष लागवड करून पर्यावरण संर्वधान करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र परिसरातील नागरिकांनी पक्ष्यांच्या विष्ठेची वास येत असल्याची तक्रार नगर परिषदेकडे केली होती.त्यामुळे परिसरातील नागरिकांची शाबासकी मिळविण्यासाठी परवानगी न घेता झाडाच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे झाडावरील पक्ष्यांची ५० ते ६० घरटी उद्धवस्त झाल्याने शेकडो लहान पक्ष्यांची पिल्ले मृत पावली आणि अनेक अंडी खाली पडल्याने फुटले. त्यामुळे या पक्षाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले.या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी ट्री संस्थेचे अध्यक्ष युवराज मुरस्कर, पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष कवडू लोहकरे, सारंग रासेकर, पंकज मिश्रा, पावन वंजारी, चेतन रासेकर आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.दरम्यान घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. वृत्तलिहेपर्यत कारवाई सुरूच होती.
बाभळीचे झाड तोडल्यामुळे शेकडो बगळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:45 PM
चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप जवळील बाबळीचे झाड तोडल्याने झाडावरील पक्ष्यांची ५० ते ६० घरटी उद्धवस्त झाली. यात शेकडो पक्ष्यांची पिल्ले मृत पावली असून अनेक अंडी खाली पडल्याने फूटली. यामुळे या झाडावरील घरट्यात असणारे शेकडो बगळे व अन्य पक्षी आपल्या पिल्ल्यांना वाचून पोरकी झाली. त्यामुळे नगर परिषद वन्यपक्षाच्या जिवावर उठल्याचे चित्र दिसत आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देहजारे पंपाजवळील घटना : चिमूर पालिका उठली पक्ष्यांच्या जीवावर