लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूरः शहरातील एकमेव ऐतिहासिक रामाळा तलावात प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करून तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी इको-प्रोने केले आहे. यासंदर्भात रामाळा तलाव परिसरात निदर्शनेही करण्यात आले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देण्यात आले.
इको-प्रोचे सदस्य रामाळा तलावाच्या काठावर असताना सभोवताल पाण्यात मृत मासे तरंगताना आढळून आले. जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळेच माशांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे.
तलाव खोलीकरण, संवर्धनासाठी दरवर्षी बैठका होतात. मात्र, जिल्हा प्रशासन निर्णय घेत नसल्याचेही इको-प्रोने म्हटले आहे.
इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात रामाळा तलाव परिसरात निदर्शने करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी इको-प्रो पर्यावरण विभागप्रमुख नितीन रामटेके, संजय सब्बनवार, अडगुरवार, हरीश मेश्राम, प्रमोद मलीक, कपिल चौधरी, अब्दुल जावेद, राजू काहीलकर, अभय अमृतकर, मनीष गावंडे, सुनील पाटील, सौरभ शेटे, जयेश बैनलवार, अमोल उटटलवार, सचीन धोतरे, पूजा गहुकर, प्रगती मार्कडवार, शंकर पोईनकर, अनिल, अरुण गोवारदिपे, प्रदत्ता सरोदे सहभागी झाले होते.