शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

वनविभागाच्या शेकडो हेक्टर जमिनीचे झाले वाळवंट

By admin | Published: November 28, 2015 1:57 AM

बल्लारपूर येथे वनविभागाचे सागवण लाकूड व तत्सम जातीचे लाकूड साठवणुकीचे मोठे आगार आहे.

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर येथे वनविभागाचे सागवण लाकूड व तत्सम जातीचे लाकूड साठवणुकीचे मोठे आगार आहे. या आगारातून देशभरातील लाकडाचे व्यापारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची प्रक्रिया पार पाडतात. येथील शेकडो हेक्टरचा परिसर वृक्षलागवडीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात न आल्याने परिसर ओसाड झाला असून वाळवंटाचे स्वरूप आले आहे. वनविभाग पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी व वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करीत आहे. वाढत्या प्रदूषणावर वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. यातूनच प्रदूषण नियंत्रीत करता येते. याच अनुषंगाने आगार परिसरात विशेष रोपवण अभियानांतर्गत हजारावर वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यावर वनविभागाच्या प्रशासनाने लाखोंचा निधी खर्च केला. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे आजघडीला या परिसराला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. वृक्षाचे जतन व संवर्धन करण्याचे काम कोणीही मनावर घेतले नाही. परिणामी लाखोंचा खर्च होऊनही वृक्षाला संजीवनी देता आली नाही.येथील वाहतुक व विपणन कार्यालयाचे तत्कालीन वनसंरक्षक अशोक खडसे यांची भूमिका परिसराला वनराईने नटविण्याची होती. तीन ते चार वर्षाच्या कालावधीत वृक्षाचे संवर्धन केल्यास वनराई आकारास येणार होती. वन उद्यानाचे स्वरूप आणण्याचा त्यांचा मानस होता. मात्र तीन महिन्यापूर्वी त्यांचे येथून स्थलांतर झाले. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिसरातील वृक्ष लागवड करण्यात आलेल्या भागाकडे कानाडोळा केला. यामुळे विविध प्रजातीची वृक्ष कोमात गेली आहेत तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, त्यावेळी सहा लाख ४० हजार रुपये खर्च करून अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी येथील नर्सरीतून तीन ते चार वर्ष वाढ झालेली विविध प्रजातीचे कलमे खरेदी करण्यात आली होती. यामध्ये वनस्पती औषधी पोषक असणारे कदम, मोहगुणी रूद्राक्ष, आवळा, कडूलिंब, बदाम, रामफळ, चिकू, काळा जांभूळ आदींच्या कलमांचा समावेश होता. फळ झाडांसह अडद तत्सम जातींच्या वृक्ष कलामांची लागवड वनरक्षक खडके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. त्यांचा तेव्हाचा प्रयत्न प्रेरणादायी होता. मात्र त्यांच्या प्रेरणादायी प्रयत्नाला हरताळ फासले आहे. यासंदर्भात वनसंरक्षक धारणकर यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत:च मात्र कोरडे पाषाण आॅगस्ट महिन्यात वाहतूक व विपणन आगार परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. आजतागायत याला तीन महिन्याचा कालावधी झाला. मात्र आजघडीला वृक्षारोपण करण्यात आलेल्या परिसराला अवकळा आली आहे. याला कारणीभूत कार्यरत अधिकारी व कर्मचारी वर्गाचा दुर्लक्षीतपणा आहे. त्यांनी वृक्ष संवर्धन करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत:च मात्र कोरडे पाषाण’ याची प्रचिती आणून देत वनविभागाने आपलेच पितळ उघड केल्याचे येथे दिसून येते.