लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सलग संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन व भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे.नवरगाव-नेरी मार्ग बंदसिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांतील शेतात पुराचे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाया जाण्याच्या मार्गावर आहे. कळमगाव, मोहाडी, नलेश्वर, खानेरा, पेटगाव, कुकडहेटी, पांगडी विसापूर यासह १९ गावांचा संपर्क तुटला आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत नवरगाव-नेरी मार्ग बंद होता. पुरामुळे नागपूर - चंद्रपूर मार्ग दुपारपर्यंत वाहतुक बंद होता.नेरी परिसरात २० घरांचे नुकसाननेरी : पावसामुळे नदी,नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे नेरी परिसरात अनेक घरांची पडझड झाली. पळसगावातील महारबोडीची पाळ फुटल्यामुळे गावातील २० घरांचे नुकसान झाले. या कुटुंबीयांना रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत भवनात हलविण्याची तयारी प्रशासनाने केली. नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये महादेव गावतुरे, शत्रुघ्न गुळधे, वसंत बनसोड, जगदीश बनसोड, मारोती चौधरी, नामदेव गावतुरे, हरिचंद गुलढे, विश्वनाथ सोनूले व खुटाळा येथील रामदास डहारे, उसेगाव येथील वनराज डांगे आदींचा समावेश आहे.चिमूर-हिंगघाट, पिपर्डा- सिंदेवाही बससेवा बंदचिमूर : मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने चिमूर तालुक्यातील सखल भागातील परिसर व निमार्णाधीन मार्गावर पुराचे पाणी शिरले. चिमूर ते हिंगणघाट, पिपर्डा- सिंदेवाही- नवरगाव- सिंदेवाही बससेवा बंद आज दिवसभर बंद ठेवण्यात आली. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढावी लागली. चिमूर हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर- पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव नाला व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरात सायंकाळपर्यंत संततधार सुरू होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजन पडले. गणेशोत्सवाचे विविध कार्यक्रम रद्द करावे लागले.लखमापुरात घर कोसळलेगडचांदूर : पावसामुळे लखमापूर येथील सुभाष बापूराव मालेकर यांचे कवेलूचे दोन मजली बुधवारी सकाळच्या सुमारास कोसळले. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गावातील पाणी टाकीजवळ सुभाष मालेकर यांचे दोन कवेलूचे घर आहे. सतत तीन दिवसांपासून पाऊस असल्याने घर अचानक कोसळले. ही माहिती मिळताच तलाठी जाधव यांनी सकाळी नऊ वाजता पंचनामा केला. या घटनेत सुमारे १ लाखाचे लाख नुकसान झाले. शासनाने तात्काळ भरपाई देण्याची मागणी सुभाष मालेकर यांनी केली आहे.
संततधार पावसामुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 12:49 AM
गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे.
ठळक मुद्देशेतीचे नुकसान : सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला