ब्रह्मपुरी : येथील कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवात शेकडो रानभाज्यांचा सहभाग असल्याने हा महोत्सव आगळावेगळा ठरला आहे.
वनभाजी महोत्सवात धनश्री वनधनविकास केंद्र चिचखेडा सहभागी झाले असून प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीस ठेवल्या होत्या. अक्षयसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेंडकी यांच्या वतीने व शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या सहकार्याने चिचखेडा येथे ३०० सभासद असलेले एक धनश्री वनधन विकास केंद्र तयार करण्यात आले. जंगलातील वनउपजावर आधारित प्रक्रिया उद्योग गावातच निर्माण व्हावेत, हा महोत्सवाचा मुख्य हेतू होता.
सात दिवस चालणाऱ्या वनभाजी महोत्सवात जंगलातील विविध प्रकारच्या पालेभाज्या, मोहाचे लाडू, वनौषधी गुडवेल, तरोटा, सोबत तळलेले मोह प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. यामध्ये केंद्राच्या कोषाध्यक्ष सुषमा मोहुर्ले, गुणवंता रामटेके व संस्थेचे सचिव सुधाकर महाडोरे हे सहभागी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष रीता उराडे यांनी केले. यावेळी प्रभाकर सेलोकर, जि.प. सदस्य दीपाली मेश्राम, जि.प. सदस्य स्मिता पारधी, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी शिरीष रामटेके उपस्थित होते.
120821\img-20210812-wa0034.jpg
वनभाजि महोत्सवात भाज्यांचे महत्त्व सांगताना