प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होताच गावागावात पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ करणारे शेकडो बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने यंदा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाणी टंचाईची समस्या उग्ररूप धारण करायला लागली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने गावशिवारात शासनाने वनराई बंधारे, शेततळे, तलाव बांधले. पाणी अडवा, पाणी जिरवा ही शासनाची संकल्पना सर्वांची भले करणारी असली तरी अनेक बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट असल्याने पावसाचे पाणी बंधाऱ्यात अडवून त्याची परिसरातील नागरिकांना लाभ घेता आला नाही. शासनाने बंधाºयावर लाखो रूपयाचा खर्च करूनदेखील शासनाला बंधाºयात पाण्याचा थेंबदेखील अडविता आला नाही. यंदा उन्हाळा सुरू होताच तापमानाच्या भडका उडायला सुरूवात झाली आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे पूर्णत: आटायला लागल्याने यावर्षी पाणी टंचाईची समस्या उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, माथरा, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, कळमना, निंबाळा हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने या गावपरिसरात जलसंकट घोंगावत आहे. या परिसरात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी असल्याने या कोळसा खाणीत पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो. परिणामी या परिसरातील जलस्तर कमालीचा घटल्याने पाण्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे.वेकोलि परिसरातील गावांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. परंतु प्रशासनाने यावर आजपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही. हे नागरिकांचे दुर्दैव आहे. शासनाने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने बंधारे बांधले. परंतु शासनाने बंधाऱ्यावर लाखो रूपयांचा खर्च करूनही प्रशासनाला बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही. राजुरा तालुक्यातील शेकडो बंधारे कोरडे पडल्याने यंदा नागरिकांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागणार आहे.यंदा पाणी प्रश्न पेटणारउन्हाळा सुरू होताच नदी, नाले, तलाव, बंधारे पूर्णत: कोरडे पडायला लागले आहे. मार्च महिन्यातच पाणी टचांई जाणवू लागली आहे. जनावरांना प्यायला पाणी मिळत नसल्याने त्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
तालुक्यातील शेकडो बंधारे पाण्याविना कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:15 PM
यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होताच गावागावात पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ करणारे शेकडो बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने यंदा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देयावर्षी पाणीप्रश्न पेटणार : उन्हाळा सुरू होताच जलसंकटाची स्थिती