शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

मालधक्क्यावर शेकडो टन खत भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:50 AM

खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही.

ठळक मुद्देचंद्रपुुरातील प्रकार : ट्रकच्या रांगा, सावरण्याआधीच मुसळधार पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही. परिणामी शेकडो टन खत पावसाच्या पाण्याने भिजल्याचा प्रकार रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूरच्या मालधक्क्यावर घडला.रविवारी सकाळपासूनच वातावरण कोरडे असल्याने पावसाची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळे मालगाडीने आलेला खत जमिनीवर उतवून ठेवण्यात आला. काही वाहतूकदारांनी खत ट्रकांमध्ये लोड केले. मात्र दुपारी १ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उघड्यावर असलेल्या शेकडो टन खतावर झाकणे शक्य झाले नाही. परिणामी शेकडो टन खत पाण्याने भिजला.‘लोकमत’ने दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली असता, खत असलेल्या जागेवर पाणी साचल्याने आढळून आले. काही ढिगांवर झाकण्यात आले होते. तर माल लोड करण्यासाठी ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या.मालधक्यावर उतरलेला माल साठवून ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती खत वाहतूक करणाºया ट्रकचालकांनी दिली.मालधक्क्यावर असुविधाचंद्रपूर येथील मालधक्क्यावर नेहमीच खत, धान्य व इतर वस्तू उतरविल्या जातात. मात्र उतरवलेला माल साठवणूक करण्यासाठी शेड नसल्याने लगेच मालाची उचल करावी लागते. याच मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगनने आलेला माल गडचिरोली जिल्ह्यातही पोहचविला जाते. त्यामुळे येथे माल साठवणुकीसाठी शेडची नितांत गरज आहे. मात्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने दरवर्षीच येथे उतरविलेला माल पावसाच्या पाण्यात भिजत असते. या मालधक्यावर कच्चा रस्ता असल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. परिणामी ट्रक चालकांनाही मोठी कसरत करावी लागते.खत विरघळणारशेतपिकांना युरिया खत अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाची लागवड करणारा शेतकरी युरिया खताची मागणी करतो. युरिया खत पाणी लागल्यास सर्वात कमी वेळात विरघळणारा खत आहे. पावसाने भिजलेला खत आता शेतकºयांच्या माथी मारला जाणार असून ५० किलोची बॅग आता कमी वजनाची भरणार आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. मात्र खताची गरज व पाण्याने खत भिजल्याची माहिती शेतकºयांना नसल्याने कृषी केंद्रात पुरवठा केला जाणार कमी वजनाचा हा खत बिनदिक्कत विकला जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी